रस्त्याच्या वादातून दसूरमध्ये पोलीस पाटील पित्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:23 AM2021-07-27T04:23:35+5:302021-07-27T04:23:35+5:30
वेळापर : माळशिरस तालुक्यात दसूर गावचे पोलीस पाटील महेश शिंदे यांचे वडील अशोक शिंदे (वय ६५) यांचा रस्त्याच्या ...
वेळापर : माळशिरस तालुक्यात दसूर गावचे पोलीस पाटील महेश शिंदे यांचे वडील अशोक शिंदे (वय ६५) यांचा रस्त्याच्या वादातून यांचा खून झाला. या खून प्रकरणाने दसूर परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत राहुल शिंदे यांनी वेळापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नात्याबा शंकर माने, प्रश्नांत नात्याबा माने, बजरंग नात्याबा माने, सिंधूबाई नात्याबा माने, सोनाली नात्याबा माने यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
माळशिरस तालुक्यात दसूर येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला जनावरे बांधल्याने माने आणि शिंदे परिवारात वाद उफाळला. जनावरे रस्त्यावर बांधली जात असल्याने रहदारीला अडथळा होतो, ती रस्त्याखाली बांधा अशी सूचना माने कुटुंबाने केली होती. यातून त्यांच्यात वाद वाढत गेला आणि शिवीगाळ, दमदाटी झाली.
दरम्यान या वादात अशोक शिंदे यांना माने कुटुंबातील व्यक्तींनी रस्त्यावर उचलून जोरात आपटल्याने जागीच मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे अधिक तपास करीत आहेत.
-----------
फोटो : २६ अशोक शिंदे