दुधनीत भाजप शहराध्यक्षाच्या घरातील जुगार अड्डयावर पोलिसांची मोठी धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 03:53 PM2022-02-24T15:53:33+5:302022-02-24T15:53:40+5:30
६७ हजारांच्या रोकडसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त
अक्कलकोट : येथील दक्षिण पोलीस स्टेशन हद्दीमधील दुधनी येथे एका राजकीय व्यक्तीच्या घरी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. त्यात ४ लाख २१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ६७ हजारांची रोकड, जुगाराचे साहित्य आणि चुचाकींचा समावेश आहे. ११ आरोपींविरुद्ध दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
सातलिंग ऊर्फ अप्पू सैदप्पा परमशेट्टी (रा. दुधनी) यांच्या राहत्या घराच्या खालील बाजूस असलेल्या खोलीमध्ये अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली. यामध्ये नागप्पा दत्तप्पा व्हंडारी (वय ३५, रा. मुगळी), इष्टलिंगप्पा श्रीशैल अमाणे (५५), नामदेव पांडू राठोड (४०), सय्यद हब्बूसाो बळुरगी (५५), हुसेन दस्तगीर नदाफ (५०, सर्व रा. दुधनी), चंद्रकांत मलकण्णा दिंडोरे (५०, रा. चलगेरा. ता. आळंद, कर्नाटक), गुरूराज भीमराव उडगी (४५, मेैदर्गी), परमेश्वर सिध्दप्पा धोत्रे (३३), राजीव गोविंद राठोड (३५), पुरू हरिश्चंद्र राठोड (५२), सातलिंग ऊर्फ अप्पू सैदप्पा परमशेट्टी (सर्व रा. दुधनी) यांच्या सांगण्यावरून त्यांच्या घराच्या खालील बाजूस असलेल्या खोलीमध्ये पैशावर पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत होते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, हवालदार अजय भोसले, पोलीस नाईक अल्ताफ शेख, पोलीस नाईक नबिलाल मियॉवाले, पोलीस अजय शिंदे यांनी केली. याप्रकरणी पोलीस नाईक नबिलाल मियॉवाले यांनी फिर्याद दिली आहे. तपास हवालदार अजय भोसले करीत आहेत.
-----
असा मुद्देमाल केला जप्त
दुधनी (ता. अक्कलकोट) येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून संशयितांना अटक करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक काळे, अजय भोसले, मियावले आदी.
----