ढोकरी येथे वाळूउपशावर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:42+5:302021-06-16T04:30:42+5:30
करमाळा : ढोकरी येथे भीमा नदीच्या पात्रात यांत्रिक बोटीव्दारे वाळूची चोरी करणाऱ्यास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ...
करमाळा : ढोकरी येथे भीमा नदीच्या पात्रात यांत्रिक बोटीव्दारे वाळूची चोरी करणाऱ्यास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून ६ लाख ४० हजारचा ऐवज जप्त करून नष्ट केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
ढोकरी येथे चोरून वाळू काढली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व त्यांचे पथक १२ जूनला रात्री ११ वाजेच्या दरम्यान ढोकरी येथे दाखल झाले. या पथकाला भीमा नदीच्या पात्रात एका यांत्रिक बोटीच्या आधारे वाळू काढली जात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र त्यांच्या इतर साथीदारांनी तेथून पळ काढला.
या कारवाईत सलीम शेख (झारखंड), नरूड शेख (प. बंगाल) तर इकरामुल शेख (झारखंड) यांना पकडण्यात आले. त्यांनी ही बोट विकास देवकर (रा.शाह, ता.इंदापुर) यांच्या मालकीची असल्याचे सांगितले. यांत्रिक बोट जप्त केली व महसूल कर्मचाऱ्यांच्या समक्ष पाण्यात बुडवून नष्ट केली.