कुर्डूवाडीत आरटीपीसीआर तपासणी करणाऱ्या तीन लॅबची पोलिसांकडून अचानक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:54+5:302021-04-22T04:22:54+5:30
तपासणी केलेल्या लॅबमध्ये मुस्कान लॅब, शुभम लॅब, श्री समर्थ लॅब यांचा समावेश आहे. या तपासणीची कारवाई, पोलीस निरीक्षक रवींद्र ...
तपासणी केलेल्या लॅबमध्ये मुस्कान लॅब, शुभम लॅब, श्री समर्थ लॅब यांचा समावेश आहे. या तपासणीची कारवाई, पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे व सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकाने केली. मात्र शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील खाजगी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली.
कुर्डूवाडी येथील संबधीत त्या तिन्ही लॅब मधून फक्त संकलन केले जाते. नंतर त्यांनी करार केलेल्या मान्यता प्राप्त पुणे व मुबंई येथील लॅबकडून त्याचे रिपोर्ट घेतले जातात. त्याबाबतची सर्व करार कागदपत्रेही तपासणीवेळी पोलिसांना दाखवली आहेत. तपासणी केलेल्या लॅबमध्ये फक्त रुग्णांचा आरटीपीसीआर घेतला जातो व करार असलेल्या कृष्णा डायगोनिसीस पुणे व मुंबईतील एका लॅबकडून रिपोर्ट आल्यानंतर येथील रुग्णांना तेथील आलेले रिपोर्ट दिले जातात हे तपासणीत आढळून आले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी सांगितले.
-----
लोक बदनामी करताहेत
कोरोनाच्या काळात ही आम्ही जीव धोक्यात घालून याबाबत काम करूनही आमची बदनामी काही लोक करीत असल्याने त्यातील काही लॅब मालकांनी बुधवारी दिवसभर लॅब बंद ठेवलेल्या दिसून आल्या. शहरातील कोणत्याही लॅबवर कोणत्याही प्रकारची पोलीस कारवाई करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. फक्त त्यांची तपासणी केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
..................