पोलीसाकडून महिलेवर बलात्कार, सोलापूरातील शहरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 04:04 PM2017-12-16T16:04:10+5:302017-12-16T16:04:41+5:30
तुझ्यावर माझे प्रेम आहे असे म्हणत घरात कोणीही नसल्याची संधी साधत अचानक घरात घुसून सोलापूर शहरातील पोलीस कॉन्स्टेबलने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : तुझ्यावर माझे प्रेम आहे असे म्हणत घरात कोणीही नसल्याची संधी साधत अचानक घरात घुसून सोलापूर शहरातील पोलीस कॉन्स्टेबलने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ भीमराव उर्फ रामलिंग अरविंद इंगळे (रा़ रामलिंग सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) असे बलात्कार करणाºया पोलीसाचे नाव आहे़ याप्रकरणी यास अटक करून न्यायालयात उभा केले असता १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे़
पिडित महिला विवाहित आहे़ घरात एकटीच असल्याने पाहुन पोलीस कॉन्स्टेबल इंगळे याने पिडितेच्या घरात जाऊन तुझ्यावर माझे प्रेम आहे असे सांगून जबरदस्तीने बलात्कार केला़ शिवाय त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे सांगितले़ व्हिडिओ आपल्या पतीस दाखविण्याची धमकी देत वेळोवेळी १५ वेळा बलात्कार केला़ पिडित महिला नोकरीस असून तिच्या घरी कोणी नसताना आरोपीने दमदाटी करून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ २९ एप्रिल २०१६ रोजी आरोपी इंगळे याचा विवाह झाला आहे़ त्याच्या लग्नानंतरही इंगळे हा पिडित महिलेस फोन करीत होता़ पिडित महिला फोन न उचलल्यास तो ती काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन फोन का उचलत नाही म्हणून त्रास देत असे़ आरोपी इंगळे याने पुन्हा आॅगस्ट २०१७ मध्ये बलात्कार केला़ त्याच्याजवळ चित्रीकरण असल्यामुळे झाला प्रकार कोणाला सांगितला नाही़ १ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पिडित महिला नोकरीवर जात असताना आरोपीने पत्रकार भवन येथे अडवून शिवीगाळ करून मारहाण केली़ शिवाय पिडितेच्या पतीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली़ याबाबत पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले़ याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक फुगे हे करीत आहेत़ न्यायालयात आरोपीकडून अॅड़ श्रीकांत गडदे यांनी काम पाहिले़