विनयभंग प्रकरणात पोलिसाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:46+5:302021-01-18T04:20:46+5:30
वैराग : वैराग पोलीस ठाणे येथील महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उमेश डोळस याचा अटकपूर्व जामीन बार्शी येथील ...
वैराग : वैराग पोलीस ठाणे येथील महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उमेश डोळस याचा अटकपूर्व जामीन बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी फेटाळला.
डोळस याने मार्च २०२० मध्ये व्हॉटसॲप डी.पी.वरून फिर्यादीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून सातत्याने त्या महिला पोलिसाला त्रास होत राहिला. वैराग पोलीस ठाण्यात संबंधित पीडित महिला पोलीस काँस्टेबलच्या फिर्यादीवरून उमेश डोळस या पोलीस कॉन्स्टेबलविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर डोळस याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने प्रथमदर्शनी घटनेत तथ्य दिसत असल्याचे मत नोंदवत शनिवारी (दि. १६) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. सध्या डोळस यास जि पोलीस मुख्यालयात नियुक्त करण्यात आले आहे.