सैराटच्या याडात पोलिसांनी नोंदला गुन्हा : अकलूज पोलिसांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस
By Admin | Published: March 24, 2017 02:59 PM2017-03-24T14:59:34+5:302017-03-24T14:59:34+5:30
सैराटच्या याडात पोलिसांनी नोंदला गुन्हा : अकलूज पोलिसांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस
सैराटच्या याडात पोलिसांनी नोंदला गुन्हा : अकलूज पोलिसांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस
माळशिरस : माळशिरस येथील न्यायालयाने रिंकु राजगुरु हिची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल केला होता. बुधवारी वेळेअभावी माळशिरस न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय घरत (रा. सरळगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे) याला वैयक्तीक जामीन मंजूर केला. यावेळी अकलूज पोलिसांवर न्यायालयाने ताशेरे ओढले. या केसमध्ये पीडित मुलीची चौकशी न करता अकलूज पोलिसांनी गुन्हा कसा काय नोंद केला? सर्वसामान्य मुलींचा गुन्हा नोंदला असता काय? एवढी घाईगडबड कशासाठी झाली? याबाबत पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
सविस्तर हकीकत अशी की, रिंकुचे वडील महादेव राजगुरू यांनी रिंकु राजगुरू हिला दत्तात्रय चिंटु घरत हा व्यक्ती गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार भेटण्याचा प्रयत्न करीत होता. रिंकु सध्या १० वीची परीक्षा देत आहे. तेव्हा तिचा पाठलाग करीत तो अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेच्यासमोर आला होता. अशा प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे अकलूज पोलिसांनी पुढील तपास करण्यासाठी १४ दिवसांच्या मॅजिस्टेट कस्टडी रिमांड मंजुरीसाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने उलट अकलूज पोलिसांवर ताशेरे ओढले. आरोपीतर्फे अॅड़ बी. आर. भिलारे व अॅड. राहुल जगदाळे यांनी पाहिले.
रिंकु राजगुरूची भेटण्याची इच्छा नसताना भेटण्यासाठी हा युवक पाठलाग करत होता. या कारणामुळे रिंकुच्या वडिलांनी अकलूज पोलिसात गुन्हा दाखल केला होता. रिंकु राजगुरूच्या ‘सैराट’ सिनेमाच्या येडापायी अनेक तरुण-तरुणींना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. परंतु ३५४ (ड) या कलमातील गुन्ह्यात स्वत: न्यायालयात जबाब देण्यासाठी माळशिरस न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. मात्र आरोपीला विचारणा केली आसता आरोपी मी फक्त रिंकुला भेटायचे म्हणत होतो, हा माझा गुन्हा झाला काय? माझे व तिचे धार्मिक सबंध आहेत, अशा प्रकारे काहीही बडबड करीत होता.