कोरोना बाधित कुटुंबातील मयताच्या अंत्यविधीला पोलीस धावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:42+5:302021-04-27T04:22:42+5:30
सांगवी गावात आत्तापर्यंत १७ व्यक्ती कोरोना बाधित झाल्या होत्या. सध्या पाच व्यक्ती पंढरपूर येथे उपचार घेत आहेत. मागील दोन ...
सांगवी गावात आत्तापर्यंत १७ व्यक्ती कोरोना बाधित झाल्या होत्या. सध्या पाच व्यक्ती पंढरपूर येथे उपचार घेत आहेत. मागील दोन दिवसापूर्वी येथील एकाच कुटुंबातील सर्व व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यामुळे त्यांना पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. असे असताना त्या कुटुंबातील घरी असलेले ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा २५ एप्रिल रोजी मृत्यू झाला. परंतु त्या कुटुंबातील सर्वजण कोरोना बाधित असल्याने मयत झालेल्या वृद्धाचा अंत्यविधी करण्यासाठी गावातील कोणीही धाडस करत नव्हते. त्यांचा मुलगाही उपस्थित राहू शकत नव्हता. त्यामुळे त्यांचे जवळचे नातेवाईक सून व जावई यांच्या उपस्थितीत पोलिसांनी कोविड नियमांचे पालन करून मयत व्यक्तीचा अंत्यविधी पार पाडला.
कोट ::::::::::::::::::::
दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली तर अशी वेळ येणार नाही. संकट कितीही मोठे असले तरी पोलीस प्रशासन प्राण पणाला लावून काम करण्याची भूमिका पार पाडत आहे.
- प्रशांत पाटील
एपीआय, करकंब