रिक्षाला धडकून पळ काढणाºया ट्रकने पोलिसाला उडविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 02:35 PM2018-04-03T14:35:20+5:302018-04-03T14:35:20+5:30

सोलापूर शहरातील घटना, जखमी वाहतुक पोलीसांचा अखेर मृत्यू

Police rushed to the police and fled the truck! | रिक्षाला धडकून पळ काढणाºया ट्रकने पोलिसाला उडविले !

रिक्षाला धडकून पळ काढणाºया ट्रकने पोलिसाला उडविले !

Next
ठळक मुद्देहृदयद्रावक दृष्य पाहता जमलेल्यांनाही अश्रु अनावर झाले.ट्रकचालक फरार झाला असून, त्याचा शोध सुरु

सोलापूर : शहरातील जोडबसवण्णा चौकात रिक्षाला धडक देऊन पळून जाणाºया एमएच १२ एचडी ७७३६ या क्रमांकाच्या ट्रक चालकाने वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयास उडविले. या अपघातात जखमी झालेल्या पोलिस कर्मचारी नागनाथ शंकर ननवरे (वय, ५२) यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथे झाला.

सोमवारी सायंकाळी एमएच १२ एचडी ७७३६ या ट्रकने एका रिक्षाला धडक दिली. याची माहिती नागरिकांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षाने तो निरोप वाहतूक शाखेच्या कर्मचाºयाला दिला. त्यानुसार वाहतूक शाखेचे कर्मचारी नागनाथ ननवरे यांनी मार्केट यार्ड चौकाजवळ ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने ननवरे यांना उडविले आणि पळून गेला.

नागरिकांनी तत्काळ वाहतूक शाखेचे कर्मचारी ननवरे यांना अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपआयुक्त नामदेव चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील जाधव, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, जोडभावी पेठचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाºयांनी रुग्णालयात येऊन भेटी दिल्या.

नातेवाईकांचा हंबरडा

  • - डॉक्टरांनी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नागनाथ ननवरे यांना मयत झाल्याचे घोषित करताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. हृदयद्रावक दृष्य पाहता जमलेल्यांनाही अश्रु अनावर झाले.

ट्रक पकडला

  • - मयत नागनाथ ननवरे यांना उडविलेला ट्रक जुना पुणे नाका येथे वाहतूक शाखेने पकडला़ मात्र ट्रकचालक फरार झाला असून, त्याचा शोध सुरु आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

Web Title: Police rushed to the police and fled the truck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.