दुचाकीच्या अपघातात पोलीस उपनिरीक्षक पंकज सातपुते जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:06 PM2017-08-21T15:06:01+5:302017-08-21T15:06:09+5:30
सोलापूर दि २१ : अंत्रोळीकर नगरात झालेल्या अपघातात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज भारत सातपुते (वय ३०) यांचा दुचाकीवरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २१ : अंत्रोळीकर नगरात झालेल्या अपघातात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज भारत सातपुते (वय ३०) यांचा दुचाकीवरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली.
रविवारी पहाटे सातपुते हे त्यांच्या दुचाकीवरुन अंत्रोळीकर नगरातील घराकडे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस रात्रीच्या वेळी अंत्रोळीकर नगरात गस्तीवर असताना त्यांना पंकज सातपुते हे रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावून पंकज सातपुते यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी पंकज यांना मयत घोषित केले. विशेष म्हणजे या अपघातात पंकज यांच्या अंगावर कोणतीही जखम नव्हती. मयत पोलीस उपनिरीक्षक पंकज सातपुते यांचे मूळ गाव मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथे रविवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामीण भागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
------------------------
एक वर्षापूर्वी झाले लग्न
च् मयत पंकज सातपुते यांचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांची पत्नी जया सातपुते या मुंबईमधील वडाळ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. जया या प्रसूतीच्या रजेवर सोलापुरात आल्या होत्या. त्यांना वीस दिवसांचा मुलगा आहे. पंकज यांचे वडील भारत सातपुते हे लष्करात होते. त्यातील मोठा मुलगा पंकज होता. त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.