आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचा पोलिसांचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:20 AM2021-03-22T04:20:53+5:302021-03-22T04:20:53+5:30

या प्रकरणात आरोपी सैदप्पा व्हसुरे याचा मुलगाही सहभागी असेल, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असून, पोलिसांचा संशय ...

Police suspect murder from financial transactions | आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचा पोलिसांचा संशय

आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचा पोलिसांचा संशय

Next

या प्रकरणात आरोपी सैदप्पा व्हसुरे याचा मुलगाही सहभागी असेल, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असून, पोलिसांचा संशय बळावत चालला आहे. खुनाच्या घटनेनंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतांच्या दुखात आरोपी व्हसुरे सामील झाला होता. मात्र, पोलिसांनी खाकी वर्दी दाखवताच खून केल्याची कबुली त्याने दिली. त्याला शनिवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. घटनेच्या तिसऱ्या दिवशी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. मयत निंबाळ यांचा व त्याचे आरोपी सैदप्पा व्हसुरे यांच्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. ही घटना घडताना प्रत्यक्षदर्शी काेण होते, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड हे करीत आहेत.

Web Title: Police suspect murder from financial transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.