दारूधंद्याची माहिती दिल्याच्या कारणावरुन पोलिसाला काठीने चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:45+5:302020-12-07T04:16:45+5:30

सांगोला : दारूधंद्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरुन चिडलेल्या दोघांनी शिवीगाळ करीत काठीने मारहाण करून पोलीस कर्मचाऱ्यास जखमी केले. ...

Police were beaten with sticks for reporting drug trafficking | दारूधंद्याची माहिती दिल्याच्या कारणावरुन पोलिसाला काठीने चोपले

दारूधंद्याची माहिती दिल्याच्या कारणावरुन पोलिसाला काठीने चोपले

Next

सांगोला : दारूधंद्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरुन चिडलेल्या दोघांनी शिवीगाळ करीत काठीने मारहाण करून पोलीस कर्मचाऱ्यास जखमी केले.

तानाजी शिवाजी इंगोले (रा. वासुद अकोला, ता. सांगोला) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ही घटना घडली.

जखमी तानाजी इंगोले हे सध्या पोलीस मुख्यालय येथे कार्यरत आहेत. ते सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे थांबले असताना संजय शिंदे आणि गोटू जाधव हे तेथे आले. तू दारूधंद्याची माहिती पोलिसांना दिली आहे का ? असा जाब विचारला असता इंगोले यांनी मला काही एक माहिती नाही, तुम्ही सांगोला पोलीस ठाण्यातील पोलिसांना विचारा असे सांगितले. चिडून जाऊन त्या दोघांनी इंगोले यांना शिवीगाळ करीत त्यांच्याजवळील लाकडी काठीने त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर जबर मारहाण केली. याबाबत त्यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संजय शिंदे व गोटू जाधव (दोघे रा. वासूद-अकोला ता.सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Web Title: Police were beaten with sticks for reporting drug trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.