अवैध धंद्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:21 AM2021-05-22T04:21:25+5:302021-05-22T04:21:25+5:30

मंगळवेढा : अवैध धंद्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांच्या भीतीने भयभीत होऊन पळून जात असताना चक्कर आल्याने तरुण युवकाचा मृत्यू झाला. ...

Of the police who came to take action on illegal trades | अवैध धंद्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांच्या

अवैध धंद्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांच्या

googlenewsNext

मंगळवेढा : अवैध धंद्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांच्या भीतीने भयभीत होऊन पळून जात असताना चक्कर आल्याने तरुण युवकाचा मृत्यू झाला. मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. नागेश नाथा हेगडे (वय-२२, रा. नंदूर, ता. मंगळवेढा), असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलीस अधिकारी व कर्मचारी गावातील हेगडे यांचे पथक दारू धंद्यावर कारवाई करण्यासाठी येताच त्यांना पाहून नागेश नाथा हेगडे (वय- २२) हा तरुण पळून जात होता. पोलीस पाठलाग करीत असल्याचे पाहून काही अंतरावर तो चक्कर येऊन कोलमडून खाली पडला.

त्यात तो बेशुद्ध झाला. त्याला गावातील डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी मंगळवेढा रुग्णालयाकडे नेण्यास सांगितले. त्यानुसार महिला हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.

याप्रकरणी मयताचे वडील नाथा हेगडे यांनी फिर्याद दिली असून, मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत कदम यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.

----

कारवाईच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात

या घटनेनंतर मयताच्या नातेवाइकांना मृतदेह मंगळवेढा पोलीस ठाण्यासमोर आणला. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाइकांनी ठाण मांडले. जवळपास तीन तास मृतदेह गाडीत ठेवला होता. अर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चा केली. चौकशी करून दोषी असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

-------------

Web Title: Of the police who came to take action on illegal trades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.