वाळूजमध्ये ३०० बालकांना पोलिओची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:51+5:302021-02-05T06:50:51+5:30
आमदार माने यांच्याकडून खरात कुटुंबाचे सांत्वन वाळूज : वाळूज (ता. मोहोळ) येथील हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या दहा वर्षीय ...
आमदार माने यांच्याकडून खरात कुटुंबाचे सांत्वन
वाळूज : वाळूज (ता. मोहोळ) येथील हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या दहा वर्षीय अनिकेत खरातच्या कुटुंबीयांचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी घरी जाऊन सांत्वन केले. यादरम्यान आमदार माने यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष अंजिक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, अनिल कादे, माजी सभापती सुशांत कादे, मार्केट कमिटीचे माजी सभापती नागेश साठे, अमोल खरात, अजित खरात, भागवत खरात, अविनाश खरात, अमोल कादे, प्रभाकर कादे, तुकाराम पाटील, कुमार कादे, कृष्णात कादे उपस्थित होते.
भोयरे बंधाऱ्याला संरक्षक कठडे लावा
नरखेड : मोहोळ तालुक्यात भोयरे येथील बंधाऱ्यात पाणीसाठा असून तो बॅरिगेटच्या माध्यमातून अडवून ठेवला आहे. मात्र, या बंधाऱ्यावर सुरक्षित असा कठडा नाही. या बंधाऱ्यावरून एकावेळी एकच वाहन जाऊ शकते इतका लहान असला तरी यावरील संरक्षक कठडे गायब झाले आहेत. रात्रीच्या वेळी या बंधाऱ्यावरून अंधारातून जावे लागते. बंधाऱ्याभोवती संरक्षक कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
तडवळ-गुड्डेवाडी रस्त्याची डागडुजी करा
अक्कलकोट : तालुक्यात तडवळ-गुड्डेवाडी रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर मोठमाेठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून अद्यापही ऊसाची वाहतूक आणि दुधाची वाहतूक होते. या रस्त्यावरुन रहदारीला अडथळा होत आहे. तसेच जड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे.