माढ्यात १०४५ बालकांना पोलिओ डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:49+5:302021-02-05T06:50:49+5:30

माढा : तालुक्यात ग्रामीण भागात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद व्होनकळस यांचे हस्ते डोज बालकांना पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ ...

Polio dose to 1045 children in Madhya Pradesh | माढ्यात १०४५ बालकांना पोलिओ डोज

माढ्यात १०४५ बालकांना पोलिओ डोज

Next

माढा : तालुक्यात ग्रामीण भागात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद व्होनकळस यांचे हस्ते डोज बालकांना पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दिवसभरात १०४५ बालकांना डोज देण्यात आला.

० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना हा डोज देण्यात आला. माढा ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने १४ बुथवर ही मोहीम राबविण्यात आली. माढा ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन ठिकाणी, माढा एस.टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, डॉक्टर विनोद शहा हॉस्पिटल, भांगे हॉस्पिटल, सनमती नर्सिंग होम, भांगे वस्ती, चवरे वस्ती, रणदिवे वाडी मुलींची शाळा आणि अंगणवाडी अशा विविध ठिकाणी

कर्मचाऱ्यांना पाठवून पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी थोरात, पोलिओ लसीकरण सुपरवायझर एम. एस. पोळ, बुथ प्रमुख एस. जे. उकिरडे, आशा सेविका वैशाली कांडगे, मंदाकिनी ढेंगळे, सुजित ढेंगळे, परिचारिका बी. बी. चवरे, सुभद्रा ढेकणे, शोभा गाडे, रेखा तुपेरे, हर्षदा तुपेरे, ललिता खरात सविता शहा, कल्पना बोबडे यांनी परिश्रम घेतले.

---

फोटो : ३१ माढा पोलिओ

लहान मुलांना डोज पाजताना ङाँ सदानंद व्होनकळस

Web Title: Polio dose to 1045 children in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.