सोलापूर जिल्ह्यातील साडेचार लाख बालकांना उद्या देणार पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 02:23 PM2020-01-18T14:23:35+5:302020-01-18T14:25:16+5:30

जिल्हा आरोग्य विभागाची तयारी : दहा वर्षांत एकही नाही आढळला रुग्ण

Polio dose to be given to 1.5 lakh children in Solapur district tomorrow | सोलापूर जिल्ह्यातील साडेचार लाख बालकांना उद्या देणार पोलिओ डोस

सोलापूर जिल्ह्यातील साडेचार लाख बालकांना उद्या देणार पोलिओ डोस

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात शहर मिळून ४३ कोटी ६४ लाख इतकी लोकसंख्या ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ५८ हजार ४ बालके आहेत२ हजार ७७९ लसीकरण केंद्रावर ८ हजार ३३३ लोकांचे पथक सज्ज

सोलापूर : जिल्ह्यात रविवार दि. १९ जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्याची झेडपी आरोग्य विभागाने तयारी केली असून, ४ लाख ५८ हजार बालकांना मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सन १९८६ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. १९८७ साली राज्यात ३ हजार १२७ रुग्ण होते. १९९८ मध्ये १२१ तर १९९९ मध्ये १८ रुग्ण आढळले होते. मोहिमेनंतर रुग्णांची संख्या कमी होत गेली. देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू आहे.  

सन २00९ मध्ये एकही रुग्ण आढळला नाही, मात्र सन २0१0 मध्ये पाच रुग्ण आढळले. त्यानंतर आजतागायत एकही रुग्ण आढळलेला नाही. इतर देशातून आलेल्यांमध्ये पोलिओ आढळण्याची शक्यता असल्याने दरवर्षी ही मोहीम कायम ठेवण्यात येत आहे. पाच वर्षांच्या आतील बालकास पूर्वीच्या लसीकरण स्थितीचा विचार न करता ही लस दिली जाणार आहे. रविवारच्या मोहिमेनंतर २१ ते २३ जानेवारी या तीन दिवसात घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. 

जिल्ह्यात शहर मिळून ४३ कोटी ६४ लाख इतकी लोकसंख्या असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ५८ हजार ४ बालके आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील २ हजार ७७९ लसीकरण केंद्रावर अधिकारी व कर्मचाºयांसह ८ हजार ३३३ लोकांचे पथक सज्ज आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी: १५३, आरोग्य पर्यवेक्षक: ११, आरोग्य सहायक: २६२, आरोग्य सेवक: ३०३, सेविका: ६५५, अंगणवाडी सेविका: ४ हजार १८६, आशा: २ हजार ७६३ असे कर्मचारी सहभागी होणार आहेत. 

प्रवास करणाºया बालकांना लस देण्यासाठी बस व रेल्वेस्थानक, मंदिर, वीटभट्टी, साखर कारखान्याच्या ठिकाणी विशेष पथके कार्यरत राहणार आहेत. शहरात महापालिका आरोग्य, तालुक्यात नगरपालिका, सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागाची यंत्रणा कार्यरत राहणार आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जयमाला बेळे, रफिक शेख उपस्थित होते.

Web Title: Polio dose to be given to 1.5 lakh children in Solapur district tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.