युतीवरच सांगोल्यातील महायुतीच्या इच्छुकांचे राजकीय भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:04 AM2019-04-29T10:04:50+5:302019-04-29T10:08:42+5:30

गणपतराव देशमुख, दीपक साळुंखे यांनी बांधली नव्याने मोट, शेकाप अन् राष्ट्रवादीला आघाडीचाच फायदा

The political future of the wishes of Mahayuti in Sangola | युतीवरच सांगोल्यातील महायुतीच्या इच्छुकांचे राजकीय भवितव्य

युतीवरच सांगोल्यातील महायुतीच्या इच्छुकांचे राजकीय भवितव्य

Next
ठळक मुद्देभाजपच्या दोघांसह शहाजीबापूंनी पिंजून काढला मतदारसंघलोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यात माढा मतदारसंघात नुकतेच मतदान झालेलोकसभा निवडणुकीच्या व्यासपीठावरून तालुक्यातील इच्छुक नेतेमंडळींनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

अरूण लिगाडे

सांगोला : विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या व्यासपीठावरून सांगोला विधानसभेसाठी शेकापचे आ. गणपतराव देशमुख, माजी आ. शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे या इच्छुकांनी जाहीर सभा, प्रचारसभेतून जनतेसमोर जाऊन साखरपेरणी केल्याचे दिसून आले.

लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यात माढा मतदारसंघात नुकतेच मतदान झाले. लोकसभा निवडणुकीच्या व्यासपीठावरून तालुक्यातील इच्छुक नेतेमंडळींनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली विधानसभेची निवडणूक शेकापचे आ. गणपतराव देशमुख विरुद्ध शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांच्यात होण्याची शक्यता असली तरी आजवर गणपतराव देशमुख यांना निर्णायक मते मिळवून देणारे दीपक साळुंखे यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

इतकेच काय, गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोशल मीडियावरून यंदाच्या निवडणुकीत दीपक साळुंखे उतरणार असल्याचे मेसेज व्हायरल करताना दिसतात़ तसे झाले तर आ. गणपतराव देशमुख यांना याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. 

सांगोला तालुक्यात पुन्हा एकदा शेकापचा झेंडा फडकवण्यासाठी पूर्वीच्या निवडणुकीप्रमाणे आ. देशमुख यांना फारसे कष्ट होणार नाहीत. कारण शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर या दोन नेत्यांचे वर्चस्व आहे. शेकापचे आ़ गणपतराव देशमुख हे नेहमीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, गट मेळाव्याच्या माध्यमातून सतत संपर्कात असतात़ 
विधानसभेच्या पराभवानंतर अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांनीही सांगोला तालुक्यात कार्यकर्त्यांशी जनसंपर्क वाढवला असून, विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावतात. भाजपचे पराभूत उमेदवार श्रीकांत देशमुख हेही तालुक्यात सतत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जनतेच्या संपर्कात आहेत. 

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात आ. गणपतराव देशमुख यांनी लोकसभेला आपण राष्ट्रवादीला मदत करणार आहोत तर विधानसभेला राष्ट्रवादी आपणाला मदत करणार आहे, असे सूचक वक्तव्य केल्याने विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा लोकसभेच्या व्यासपीठावरूनच सुरू झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, नगरपालिका निवडणुकीनंतर झेडपी व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या लक्षणीय यशामुळे आत्मविश्वास बळावलेला शहाजीबापू पाटील यांचा गटही तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाला आहे. तालुक्यातील तरुण पिढी शहाजीबापूंना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी कामाला लागली आहे. २०१४ च्या निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपची युती तुटल्याने त्याचा फटका सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांना बसला होता; तर भाजपचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांनी निर्णायक १४ हजार मते मिळवून शहाजीबापूंना विजयापासून रोखले होते. 

युतीवरच महायुतीच्या इच्छुकांचे राजकीय भवितव्य

  • - गत निवडणुकीत संभाजी आलदर यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. आता त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर भाजपच्या राजश्री नागणे याही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या सर्वांची भूमिका महायुतीच्या उमेदवाराचे राजकीय भवितव्य ठरविणारी असेल. 
  • - लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठीही शिवसेना-भाजप युती कायम राहिल्यास व महायुतीने विधानसभेसाठी सांगोल्यातून बंडखोरी रोखल्यास २०१९ ला होणाºया विधानसभा निवडणुकीचे सांगोला तालुक्यातील कदाचित चित्र वेगळे असेल.

Web Title: The political future of the wishes of Mahayuti in Sangola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.