राजकीय हस्तक्षेपाचा गारपीटग्रस्तांना फटका चुंगीत पंचनामे टाळले :

By admin | Published: May 11, 2014 12:17 AM2014-05-11T00:17:14+5:302014-05-11T00:17:14+5:30

शेतकर्‍यांची तक्रार

Political interference in Chhattisgarh: | राजकीय हस्तक्षेपाचा गारपीटग्रस्तांना फटका चुंगीत पंचनामे टाळले :

राजकीय हस्तक्षेपाचा गारपीटग्रस्तांना फटका चुंगीत पंचनामे टाळले :

Next

सोलापूर : एकीकडे पिकांचे पंचनामे केले नसल्याच्या तक्रारीसाठी गारपीटग्रस्त शेतकरी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेत आहेत़ दुसरीकडे पुढार्‍यांच्या दहशतीमुळे चुंगी (ता़ अक्कलकोट) येथील पंचनामे झाले नसल्याची तक्रार पुढे आली आहे़ या दहशतीचा फटका चुंगीच्या ७५ शेतकर्‍यांना बसला आहे़ गारपीट आणि अवकाळी पावसाने चुंगी येथील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले़ कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवकांच्या पथकाकडून नुकसानीचे रितसर पंचनामे सुरू होते़ येथील राजकीय पुढार्‍यांनी कृषी सहायक लादे, तलाठी भोरे यांना फोनवरून दमदाटी केली़ आम्ही सांगू त्याच शेतकर्‍यांचे पंचनामे करा, दुसर्‍यांचे कराल तर याद राखा, असा दम भरला़ या दहशतीमुळे पथकाने काही शेतकर्‍यांचे पंचनामे करण्याचे टाळले़ गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची हानी होऊनही दबावामुळे पंचनामे झाले नाहीत़ याचा फटका चुंगीच्या ७५ शेतकर्‍यांना बसला आहे़ एकीकडे जास्तीत जास्त शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणी धडपडतात तर चुंगीत विरोध करण्यात आला़ याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ शेतकर्‍यांनी या प्रकाराची माहिती दिली़ वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Political interference in Chhattisgarh:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.