राजकीय हस्तक्षेप वाढला.. कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:33+5:302021-05-30T04:19:33+5:30

कुर्डूवाडी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात अनेक स्तरांवरून तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी ...

Political interference increased .. Take action | राजकीय हस्तक्षेप वाढला.. कारवाई करा

राजकीय हस्तक्षेप वाढला.. कारवाई करा

Next

कुर्डूवाडी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात अनेक स्तरांवरून तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला काम करीत असताना अहवेलना, कामाबद्दल दबाव, दमबाजी व राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारीवर्गांचेही मनोधैर्य खचत चालले आहे. नुकतेच करमाळा, रोपळे, कव्हे येथे अशा घटना घडल्या आहेत. गुन्हा दाखल झालेल्यावर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशा एकूण तेरा विषयांबाबत निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शिंदे, डॉ. पी. व्ही. पलंगे, डॉ. धनराज कदम, डॉ. अमोल माने, डॉ. शरद थोरात, डॉ. समर्थ कांबळे, डॉ राखी भंडारे आदी उपस्थित होते.

------२९कुर्डूवाडी-हेल्थ

कुर्डूवाडी येथे उपविभागीय अधिकारी जोती कदम यांच्याकडे विविध प्रकारच्या मागण्यांबाबत निवेदन देताना महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी (वर्ग-अ )संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ. शिवाजी थोरात. यावेळी डॉ. पी. व्ही पलंगे, डॉ. अमोल शिंदे, डॉ. समर्थ कांबळे आदी.

Web Title: Political interference increased .. Take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.