निवडणुकीपुरते राजकारण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:14+5:302021-09-21T04:24:14+5:30
ग्रामसेवकांनी योजनेचे फलक लावावेत - खासदार राजेनिंबाळकर बार्शी : प्रत्येकांनीच निवडणुकीपुरते राजकारण करावे. त्यानंतर सारं विसरुन सामाजिक ...
ग्रामसेवकांनी योजनेचे फलक लावावेत
- खासदार राजेनिंबाळकर
बार्शी : प्रत्येकांनीच निवडणुकीपुरते राजकारण करावे. त्यानंतर सारं विसरुन सामाजिक कार्य करावे. गावात विविध योजनांबाबत अधिकाऱ्यांनी जनजागृती करावी. ग्रामसेवकांनी विविध योजनांच्या जनजागृतीबाबत गावात फलक लावून जनजागृती करावी. योजनांची माहिती गावकऱ्यांना झाली पाहिजे, असे प्रतिपादन खा. ओम राजेनिंबाळकर यांनी केले.
खा. निंबाळकर यांनी लोक संपर्क अभियान अंतर्गत तालुक्यातील पांगरी व पांढरी येथे भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी खा. निंबाळकर म्हणाले, वैयक्तिक लाभार्थींसाठी ज्या योजना आहेत या योजनेच्या कर्मचाऱ्यांनी दोन गावांच्या विकासात हातभार लावावा. निवडणुकीपुरते राजकारण सोडून निवडणुका संपल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी गावाच्या विकासासाठी एकत्रित यावे. जलजीवन मिशन अंतर्गत गावात रखडलेली कामे पूर्ण करावीत, असे आवाहन केले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण काकडे, जिल्हा परिषद सदस्य रेखा राऊत, उपतालुकाप्रमुख आबा गपाट, उपतालुकाप्रमुख राजाभाऊ पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह तालुकास्तरावरील अधिकारी, कर्मचारी, गावातील नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते.
----