अनागोंदी कारभार लपविण्यासाठीच महाराष्ट्रात लसीकरणाचे राजकारण : केशव उपाध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:25+5:302021-04-10T04:22:25+5:30

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी आलेल्या केशव उपाध्ये यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते काशिनाथ थिटे, शहराध्यक्ष ...

The politics of vaccination in Maharashtra only to cover up the chaos: Keshav Upadhyay | अनागोंदी कारभार लपविण्यासाठीच महाराष्ट्रात लसीकरणाचे राजकारण : केशव उपाध्ये

अनागोंदी कारभार लपविण्यासाठीच महाराष्ट्रात लसीकरणाचे राजकारण : केशव उपाध्ये

Next

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी आलेल्या केशव उपाध्ये यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते काशिनाथ थिटे, शहराध्यक्ष विक्रम शिरसट, अनुप देवधर, शंतनु दंडवते, प्रणव बाडगंडी आदी उपस्थित होते.

यावेळी उपाध्ये यांनी विद्यमान महाराष्ट्र सरकारमध्ये ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन’ हे सोल्युशन नाही, अशी परिस्थिती सुरू असल्याचा टोला लगावला. कोरोनाची महामारी असतानाही राज्य सरकार लसीकरणावरून करीत असलेले राजकारण भयंकर आहे. देशात सर्वाधिक लस महाराष्ट्राला मिळाली आहे. केवळ महाराष्ट्र, राजस्थान व गुजरात या तीन राज्यांना एक कोटीहून अधिक लसीचे डोस दिले आहेत, परंतु सुरुवातीला राज्य सरकारने लसीकरणाचा वेग वाढविला नाही, याची यंत्रणाही उभारली नाही. राज्यातील मंत्रीच या लसीविषयी शंका उपस्थित करीत होते. यामुळे लसीकरण वेगाने न झाल्यानेच, आज महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला.

कोरोना हातळण्यात आलेले अपयश, मंत्र्यांचा भ्रष्ट कारभार, वाझे प्रकरण यावरून लक्ष हटविण्यासाठी लसीकरणाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. आजही २४ लाख लसीचे डोस शिल्लक असल्याचा दावा त्यांनी करून तुमच्या राजकारणासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळू नका, असे आवाहन केले.

सध्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री व विविध नेते मंडळी पंढरपूरसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे आश्‍वासन देत आहेत, परंतु मागील दीड वर्षात एक रुपयाचा नवा निधी या सरकारने दिला नाही. पंढरी हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असूनही येथे निधी न दिल्यामुळे विकासकामे ठप्प असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यात कोरोनामुळे हाहाकार माजला असून, आरोग्य यंत्रणा कोसळली आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्येही उपमुख्यमंत्री केवळ एका विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पंढरीत दोन दिवस मुक्काम करतात, हे जनतेचे दुर्दैव असल्याचीही त्यांनी टीका केला.

Web Title: The politics of vaccination in Maharashtra only to cover up the chaos: Keshav Upadhyay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.