राजकारण; चंदनशिवे-काेठे-नराेटेंच्या साक्षीने उत्तरमध्ये पालकमंत्र्यांनी फाेडला नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 12:58 PM2021-08-07T12:58:55+5:302021-08-07T12:59:01+5:30

निमित्त विकासकामांचे : शासनाच्या निधीतून स्थानिक नगरसेवकांना बळ देण्याची माेहीम

Politics; Witness of Chandanshive-Kathe-Narate | राजकारण; चंदनशिवे-काेठे-नराेटेंच्या साक्षीने उत्तरमध्ये पालकमंत्र्यांनी फाेडला नारळ

राजकारण; चंदनशिवे-काेठे-नराेटेंच्या साक्षीने उत्तरमध्ये पालकमंत्र्यांनी फाेडला नारळ

Next

साेलापूर : महापालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे, विराेधी पक्षनेता अमाेल शिंदे, महेश काेठे आणि चेतन नराेटे यांना साक्ष ठेवत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील केगावमध्ये विकासकामांचा नारळ फाेडला. केगाव, बाळे व परिसराला विशेष निधी देण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासनही दिले.

लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आनंद चंदनशिवे यांनी केगाव येथे रस्त्यासह इतर विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन झाले. महापाैर श्रीकांचना यन्नम, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषाेत्तम बरडे, विराेधी पक्षनेता अमाेल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संताेष पवार, महेश काेठे, चेतन नराेटे, किसन जाधव, गणेश पुजारी, नगरसेविका ज्याेती बमगाेंडे, उपायुक्त धनराज पांडे, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जीएम संस्थेचे बाळासाहेब वाघमारे, पी.बी. ग्रुपचे गाैतम चंदनशिवे, मातंग समाजाचे पंच हणमंतु पवार, पतंजली याेग समितीच्या सुधा अळ्ळीमाेरे, सर्जेराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती हाेती.

 

पालकमंत्री भरणे यांनी केगाव, वसंत विहारसह विविध भागांत कामांचे भूमिपूजन केले. यानिमित्त आयाेजित कार्यक्रमांच्या मंचावर येताच भाषणाला सुरुवात केली. त्यांच्या मागे सर्व नेते, अधिकारी उभे राहिले. गाेरगरिबांची कामे करणाऱ्या नेत्याला लाेक लक्षात ठेवतात. श्रीमंत माणसांची कामे केली तर श्रीमंत लाेक लक्षात ठेवत नाहीत. बाळे, केगाव व इतर भागात आणखी काही कामे करायची असतील तर सांगा, असा सवाल त्यांनी चंदनशिवे, काेठे, शिंदे यांना विचारला. या नगरसेवकांनी कामांची माहिती दिली.

----

तुम्ही कामाला लागा

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दाैऱ्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक एकत्र हाेते. या नगरसेवकांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांची यादी सादर केली. जिल्हा नियाेजन समितीच्या निधीतून तुम्हाला निधी दिला जाईल. मी तुमच्या अडचणी दूर करताे. तुम्ही कामाला लागा, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Politics; Witness of Chandanshive-Kathe-Narate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.