माढा लोकसभेसाठी मतदान सुरू; सकाळच्या सत्रात सहा केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड
By appasaheb.patil | Published: April 23, 2019 08:50 AM2019-04-23T08:50:15+5:302019-04-23T08:55:10+5:30
भाजपचे रणजितसिंह नाईक - निंबाळकर व राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात प्रमुख लढत
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. माढा मतदारसंघात 19 लाख 4 हजार 883 मतदार आहेत. माढा मतदारसंघातील 2025 मतदान केंद्रावर मतदान होत असून यासाठी बारा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती् करण्यात आली आहे. माढा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आले असून या मतदान केंद्रावर महिला मतदार यांच्या रांगा लागल्या आहेत.
आज सकाळी आठच्या सुमारास माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी मतदान केले.
Live...
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघात मतदान सुरू, राष्ट्रवादी चे संजय शिंदे व भाजप चे रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 158,160 वरील मशीन बंद
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला येथील भोपळे रोडवरील मराठी शाळा नंबर 1 येथील मतदान केंद्र 140 मधील मशीन एक तास झाले बंद, मतदान प्रक्रिया खोळंबली
मशीन बंद असल्यामुळे मतदार परत जाऊ लागले
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी चे उमेदवार संजय शिंदे यांनी केले मतदान
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्र 155 मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली आहे तर भीम नगर येथे मतदान केल्यानंतर मशीन चे बटन पडत नव्हते त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली