मतदानादिवशी मिळणार सुटी अथवा दोन तासाची मिळणार सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:12+5:302021-03-27T04:23:12+5:30
या आदेशात असे नमूद केले आहे की, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक होणाऱ्या ...
या आदेशात असे नमूद केले आहे की, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाच हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकानांना लागू असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकाी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, असे म्हटले आहे.
----एक्झिट पोलला बंदी---
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने २७ मार्च च्या सकाळी ७ वाजल्यापासून ते २९ एप्रिल २०२१ रोजीच्या सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत कोणत्यााही प्रकारचा एक्झिट पोल आयोजित करणे, प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रसिध्द करण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली आहे.