सोलापूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी २७ फेब्रुवारीला मतदान, २८ फेबु्रवारीला मतमोजणी, निवडणुक यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:09 PM2018-02-17T13:09:21+5:302018-02-17T13:10:35+5:30
जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक आणि १६४ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान आणि २८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७ : जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक आणि १६४ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान आणि २८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. परंतु आॅनलाईन प्रक्रियेच्या घोळामुळे इतर कार्यक्रमातही बदल करण्यात आले. मतमोजणी यापूर्वी २६ फेब्रुवारीला होणार होती; मात्र आता ती २८ फेब्रुवारीला होईल. शुक्रवारी सायंकाळी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असला तरी नेमके किती उमेदवार रिंगणात आहेत याबाबत माहिती तहसील कार्यालयांकडून ग्रामपंचायत शाखेला प्राप्त झालेली नव्हती.
--------------------
येथे निवडणूक
- करमाळा : रावगाव, केम, कावळवाडी.
- अक्कलकोट : नन्हेगाव, करजगी.
- माळशिरस : देशमुखवाडी, कन्हेर, लवंग, कोंढारपट्टा, सवतगव्हाण.
- पंढरपूर : गुरसाळे.
- मोहोळ : जामगाव खुर्द, मलिकपेठ / दार्इंगडेवाडी / खरकटणे.
----------------
रिक्त पदांवरील पोटनिवडणूक :
करमाळा २०, माढा ६, बार्शी ४६, उत्तर सोलापूर ४, मोहोळ ४, पंढरपूर ५, माळशिरस १५, सांगोला ११, मंगळवेढा ४, दक्षिण सोलापूर १८, अक्कलकोट २९.