सोलापूर अन् माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान
By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 16, 2024 05:23 PM2024-03-16T17:23:53+5:302024-03-16T17:24:18+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
सोलापूर : देशात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असून सोलापूर व माढा लाेकसभा मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. तिसरा टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार असून यंदा पहिल्यांदाच सोलापूर व माढा लाेकसभा मतदार संघासाठी एकाच दिवशी निवडणूक होत आहे. २०१९ साली सोलापूर लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १८ एप्रिल तसेच तसेच माढा लोकसभा मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी मतदान झाले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे रविवार, १७ मार्च रोजी सकाळी विविध पक्ष प्रतिनिधींची बैठक बोलावली असून आचारसंहिता संबंधित नियोजनाबाबत प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ तसेच इतर विविध विभाग प्रमुखांची देखील बैठक बोलावली आहे. या दोन्ही बैठकीनंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद रविवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.सोलापूर अन् माढा लोकसभा मतदार
संघासाठी ७ मे रोजी मतदान