कडक निर्बंधाबाबत येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:30+5:302021-04-09T04:23:30+5:30

राज्यात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध कडक करीत अत्यावश्यक ‘ब्रेक दि चेन’ द्वारे सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे ...

Positive decision in the next two days regarding strict restrictions | कडक निर्बंधाबाबत येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय

कडक निर्बंधाबाबत येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय

Next

राज्यात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध कडक करीत अत्यावश्यक ‘ब्रेक दि चेन’ द्वारे सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी, नागरिक नाराज आहेत. अजित पवार पंढरपूर दौऱ्यावर येताच त्यांनी या नाराज व्यापाऱ्यांसोबत कल्याणराव काळे यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. अनेक ठिकाणी खुलेआम गर्दी होताना केवळ लहान मोठे उद्योग व्यवसाय बंद करून त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याचे गाऱ्हाणे व्यापाऱ्यांनी मांडले. हॉटेल व्यावसायिकांनी सकाळी ९ ते रात्री १० पर्यत फक्त पार्सलसाठी परवानगी द्यावी तर इतर व्यावसायिकांनी काहीही अटी घाला मात्र लाॅकडाऊन नको त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. अनेक कामगार, लहान व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

---

सहकार्य करण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापारी प्रतिनिधीच्या तक्रारी ऐकून घेतल्या व राज्यात कोरोनाची परिस्थती किती गंभीर आहे याबाबत व्यापाऱ्यांना सूचित केले. अनेक ठिकाणी भयावह परिस्थिती आहे. एकाच सरणावर दहा-दहा लोकांचा अंत्यविधी केला जात आहे. त्यामुळे हा वाढणारा संसर्ग थांबविण्यासाठी राज्यसरकार निर्बंध घालत आहे. त्याला व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र राज्य सरकार व्यापाऱ्यांसोबत असून, येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी व्यापाऱ्यांना दिले.

Web Title: Positive decision in the next two days regarding strict restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.