मोहोळच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा : क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:26 AM2021-08-28T04:26:16+5:302021-08-28T04:26:16+5:30
मोहोळ : मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवेदन देऊन ...
मोहोळ : मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवेदन देऊन विकासकामासाठी निधीची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विकासकामांसंंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक हे राष्ट्रीय महामार्गाचे मध्यवर्ती ठिकाण असूनही पशुवैद्यकीय दवाखाना नाही. शेतकऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. पीरटाकळी येथील शेतकऱ्यांना विजेच्या समस्येमुळे दिवस-रात्र विजेसाठी त्रास सहन करावा लागतो. येथे ३३/११ केव्हीचे सबस्टेशन मंजूर झाले तर शेतकऱ्यांचा त्रास कमी होणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाची शाखा सुरू करणे गरजेचे आहे. कामती येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर व्हावे, मोहोळला उपजिल्हा रुग्णालय व्हावे, मोहोळला क्रीडासंकुल व्हावे, नांदगाव येथे सीना नदीवर सीएनबी पद्धतीचा सिमेंट बंधारा मंजूर व्हावा, आदी मागण्यांचा समावेश निवेदनात केला आहे. हे सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात निधीची मागणी केली असल्याचे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले.
-----