सकारात्मक! कोरोनाकाळात ग्रामीण भागातही डॉक्टर देताहेत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 02:26 PM2021-06-24T14:26:30+5:302021-06-24T14:27:12+5:30

ग्रामीण भागात ४७, शहरात ७१ डॉक्टरांची नियुक्ती : काही अजूनही वेटिंगव

Positive! Doctors also provide services in rural areas during the Corona period | सकारात्मक! कोरोनाकाळात ग्रामीण भागातही डॉक्टर देताहेत सेवा

सकारात्मक! कोरोनाकाळात ग्रामीण भागातही डॉक्टर देताहेत सेवा

Next

सोलापूर : ग्रामीण भागामध्ये काम करण्यास सहसा डॉक्टरांचा नकार असतो. मात्र, कोरोनाकाळात यात सकारात्मकता दिसत आहे. कोरोनाकाळात कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात ४७, तर शहरात ७१ डॉक्टर हे काम करत असून, आणखी डॉक्टर हे वेटिंगवर आहेत.

कोरोनाकाळात दिलेल्या नियुक्त्या या डॉक्टरांनी स्वीकारल्या आहेत. डॉक्टर हे काम करण्यास तयार आहेत. मागील चार ते पाच वर्षांपूर्वी डॉक्टर हे ग्रामीण भागात काम करण्यास अनुत्सुक होते. मात्र, यात आता बदल होताना दिसत आहे. त्यावेळी ग्रामीण भागात पाणी, वाहतूक, राहण्याची सुविधा नसायची. आता वाहतूक, इंटरनेटमुळे अडचणी येत नाहीत. त्यांच्या राहण्याची चांगली सोय करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेंतर्गत सध्या नियमित काम करणारे ८० एमबीबीएस डॉक्टर आहेत. कंत्राटी सहा बाँडेड असे १९, असे एकूण १०५ डॉक्टर काम करत आहेत. बीएएमएसचे ५६ कंत्राटी डॉक्टर काम करत आहेत. कोविडअंतर्गत एमबीबीएस १८ डॉक्टर काम करत आहेत. त्यापैकी १५ जिल्हा परिषदेत, तर तीन महापालिकेत काम करत आहेत. बीएएमएस ३२ जिल्हा परिषदेने, तर महापालिकेने ६८ जणांना नियुक्त केले आहे, असे १०० आहेत. ११८ वैद्यकीय अधिकारी कोरोनाकाळात काम करत आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढल्यास डॉक्टरांचीही संख्या वाढू शकते.

---------

कोरोनाकाळात एकूण नियुक्त्या

  • शहर भागातीत नियुक्त ७१
  • ग्रामीण भागात नियुक्त ४७

----

डॉक्टर वेटिंगमध्ये...

कोविडमध्ये काम करण्यास डॉक्टर तयार आहेत. त्यामुळे सध्या डॉक्टरांच्या जागा या रिक्त नाहीत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे अजूनही डॉक्टर काम करत आहेत. गरज पडल्यास आणखी डॉक्टरांना नियुक्त केले जाऊ शकते. कोरोना असेपर्यंत त्यांच्या नियुक्त्या कायम असणार आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांना चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे ते ग्रामीण भागात काम करण्यात तयार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातदेखील डॉक्टर सेवा देत आहेत. ग्रामीण भागात रस्ते, इंटरनेटच्या सुविधा यामुळेही तिथे काम करताना अडचणी येत नाहीत.

-डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

सोलापूर जिल्ह्यातील तालुका व मोठ्या गावात काम करण्यास डॉक्टर लगेच तयार होतात. त्याप्रमाणे मीदेखील काम करत आहे. लहान गावात काम करताना काही अजूनही अडचणी येतात. मात्र, त्या इतक्या मोठ्या नाहीत, तसेच गावातच राहण्याची सोय असल्यामुळे कामानंतरचा वेळ आम्हाला अभ्यासासाठी देता येत आहे.

-कंत्राटी एमबीबीएस डॉक्टर

 

बीएएमस डॉक्टरांना वेतन हे ३० हजार, तर एमबीबीएस डॉक्टरांना ६० हजार वेतन दिले जात आहे. दोन्ही प्रकारच्या डॉक्टरांच्या वेतनात मोठी तफावत आहे. जे एमबीबीएसचे डॉक्टर काम करतात, तेच आम्हीही करतो. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे दोन्ही डॉक्टरांचा दर्जा समान असताना आम्हाला कमी वेतन दिले जाते.

-कंत्राटी बीएएमएस डॉक्टर

 

Web Title: Positive! Doctors also provide services in rural areas during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.