पोस्ट कोविड डेथ; कोरोनातून बरे झाल्यानंतरही मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 02:02 PM2021-05-17T14:02:22+5:302021-05-17T14:02:33+5:30
औषधांचा अतिरेक,काळजी न घेतल्याचाही परिणाम
सोलापूर : कोरोनातून बरा झालो म्हणजेे फिरायला मोकळा झालो, औषधोपचार बंद करु या असे अनेकांना वाटू शकतो. मात्र, हाच विचार अनेकांच्या जीवावर बेतत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. काहीजणांचा मृत्यू तर रुग्णालयातच होत आहे. सरकारी दरबारी याची कुठेही नोंद नाही. जनजागृतीचे प्रयत्नही नाहीत.
नई जिंदगी शिवगंंगा नगर येथील एका ५० वर्षीय महिलेने पालिकेच्या बॉइस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. कोरोनातून बरे झाल्या म्हणून डॉक्टरांनी त्यांना घरी पाठविले. चार दिवसानंतर पुन्हा या महिलेचा माथा गरम झाला. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे पुन्हा सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी या महिलेचा मृत्यू झाल्याचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सांगितले. या महिलेला मधुमेहाचा त्रास होता.
टेेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्त्याने करमाळा येथील रुग्णालयात कोरोनावर उपचार घेतले. बरे वाटू लागल्यानंतर डॉक्टरांंनी तीन ते चार दिवस रुग्णालयात थांबण्याचा सल्ला दिला. त्यांना मधुमेहाचा त्रास होता तरीही ते घरी आले. चार दिवसांनी त्यांंना अर्धांगवायूचा झटका आला. यात त्यांचा एक डोळा आणि हात निकामी झाला. त्यांना तातडीने बार्शी येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात आल्यानंतर त्यांची शुगर वाढली होती तर रक्तदाब कमी झाला होता. तिसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
कोरोनावर मात केल्यानंतर काहींच्या मनात भीतीचे सावट असते. त्यातूून रक्तदाब वाढतो. हृदयविकाराचा त्रास असलेले रुग्ण या काळजीमुळेच दगावतात, असे निरीक्षणही महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदविले. शहरातील मोठ्या व छोट्या रुग्णालयांमध्ये असे मृत्यू झालेे आहेत. अनुुभवी असो वा नव्या दमाचे डॉक्टर. प्रत्येकाने हाताळलेल्या काही रुग्णांवर हे संकट कोसळलेलेे आहे.
कोरोना हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल होतात. यासाठी वेळेवर तपासणी व उपचार आवश्यक आहेत. रक्त पातळ होण्याची औषधे घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा कोरोना काळात घेतलेल्या औषधांमुळेही लिव्हरवर परिणाम होता, बुरशीजन्य आजाराचा धोका संभवितो. त्यामुळे कोरोनातूून बरे झाल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयएमए महापालिका आणि शासनाला वेळोवेळी निर्देशित करीत आहे.
- डॉ. मिलिंद शहा, अध्यक्ष, आयएमए, सोलापूर.
हृदयरोग, मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये पोस्ट कोविडचा धोका आहे. परंतुु, यात मृत्यूूचे प्रमाण दोन ते तीन टक्केच आहे. म्युकरमायकोसिस सारखा इतर प्रकारचा संसर्गही अनेकदा होऊ शकतो. कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुुसार होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केेला पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जायचे नाही. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलो तर मास्कचा वापर करायचा. घरातच व्यायाम, प्राणायाम करून प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करायचा.
- डॉ. अमोल आचलेरकर, मार्कंडेय हॉस्पिटल.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे केवळ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद होते. कोरोनावर मात केल्यानंतरही अनेकांचा बळी गेला आहे. याची कुठेही नोंद होत नाही. अनेेक रुग्ण न्युमोनियासदृश आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. त्याचीही कुठेही नोंद नाही.
----
कोरानानंंतर येेतोय हृदयविकाराचा धक्का
कोरोनानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचेही प्रकार घडले आहेत. लष्करमधील करण म्हेत्रे या कार्यकर्त्याचा शनिवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. म्हेत्रे यांनी कोरोनावर मात केली होती, मात्र त्यानंतर त्यांची शुुगर वाढली होती. रक्तात गुठळ्या झाल्या होत्या. यासाठी डि डायमर चाचणी करण्यात आली. या चाचणीचे प्रमाण ५०० असावे लागते. मात्र म्हेत्रे यांच्या शरीरातील प्रमाणे ४५०० वर पोहोचले होते, असेे विनीत हॉस्पिटलचे डॉ. व्ही.पी. सूर्यवंशी यांंनी सांगितले. त्यातून त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. कोरोनावरील औषधांचाही शरिरावर परिणाम होतोय, असेही डॉ. सूर्यवंशी म्हणाले.