दहा वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:41 AM2020-12-05T04:41:05+5:302020-12-05T04:41:05+5:30
सांगोला ग्रामीण रुग्णालयात दैनंदिन रुग्णसेवेसाठी वैद्यकीय अधीक्षकासह ३५ मंजूर पदांपैकी विविध संवर्गातील २३ पदांवर अधिकारी, आरोग्य कर्मचारी कर्तव्यावर आहेत, ...
सांगोला ग्रामीण रुग्णालयात दैनंदिन रुग्णसेवेसाठी वैद्यकीय अधीक्षकासह ३५ मंजूर पदांपैकी विविध संवर्गातील २३ पदांवर अधिकारी, आरोग्य कर्मचारी कर्तव्यावर आहेत, तर १२ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून येथील वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त असल्याने प्रभारी वैद्यकीय अधीक्षकावर रुग्णालयाचे कामकाज चालत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ११ वैद्यकीय अधीक्षकांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. ११ पैकी एका ठिकाणी वैद्यकीय अधीक्षकाचे पद भरले आहे. सांगोला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह १२ पदे रिक्त आहेत. यात अधिपरिचारिकेच्या ३, क्ष-किरण तंत्रज्ञ २, कक्षसेवक २, शिपाई १, सफाई कामगार १, दंत सहायक १, औषधनिर्माता १, नेत्र चिकित्सा सहायक १ व वैद्यकीय अधीक्षक १ अशी १२ पदे रिक्त आहेत.
पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षकाची प्रतीक्षा
सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक उद्धव शिंदे यांच्या निवृत्तीनंतर ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक मिळालेला नाही. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पीयूष साळुंखे-पाटील यांच्यानंतर डॉ. पूजा साळे या पदावर प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयास पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक कधी मिळणार, याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे.