सोलापूरसह जिल्ह्यात पाच ठिकाणी पोस्ट पेमेंट बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:37 PM2018-08-24T12:37:13+5:302018-08-24T12:39:18+5:30

Post payment bank in five districts in Solapur district | सोलापूरसह जिल्ह्यात पाच ठिकाणी पोस्ट पेमेंट बँक

सोलापूरसह जिल्ह्यात पाच ठिकाणी पोस्ट पेमेंट बँक

googlenewsNext
ठळक मुद्देबहुचर्चित पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ १ सप्टेंबर रोजी दिल्लीत‘पेपरलेस अकाउंट़़ पेपरलेस पासबुक’ हे पोस्ट बँकेचे खरे वैशिष्ट्य

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : वाढती धावपळ, लांब अंतर, वेळखाऊ, प्रवास खर्च आणि सेवेतील त्रुटी या साºया गोष्टींवर मात करणाºया ‘पोस्ट पेमेंट बँके’चा देशभरात १ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे़ सोलापूर जिल्ह्यात मुख्य पोस्ट कार्यालय, बार्शी तालुक्यात गौडगाव, भालगाव, मालेगाव (वैराग) अशा पाच ठिकाणी ही सेवा सुरु होत आहे़ ‘पेपरलेस अकाउंट़़ पेपरलेस पासबुक’ हे पोस्ट बँकेचे खरे वैशिष्ट्य असून एरव्ही पत्र वाटत येणारा पोस्टमन मागणीनंतर घरी येऊन पैसे देऊन जाणार आहे

बहुचर्चित पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ १ सप्टेंबर रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे़ तसेच देशभरात संबंधित लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ होत आहे़ सोलापूर जिल्हा पोस्ट कार्यालयात खा़ शरद बनसोडे यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ होत आहे़ पोस्टाच्या प्रवेशद्वारावरच उजव्या बाजूला पोस्ट पेमेंट बँकेचे कार्यालय फर्निचरने थाटले आहे़ जसा पत्र वाटत घरोघरी येतो तसा आता हा पोस्टमन घरोघरी मागणीनुसार पैसे घेऊन-देऊन जाणार आहे़ मात्र घालण्यात आलेल्या मर्यादेनुसार खातेदाराला एकावेळी ५ हजार रुपयेच काढता येणार आहेत़ तसेच जास्तीत जास्त लाख रुपये खात्यावर एकावेळी जमा करता येणार आहेत़ ही रक्कम घरपोच हवी असल्यास खातेदाराने पोस्टाच्या कार्यालयाशी फोनवरुन संपर्क साधून किती रक्कम हवी आहे ते सांगायचे आहे

विशेषत: ५० रुपयात हे  खाते खोलता येते आणि चेकबुक असल्यास कमीत कमी खात्यावर ५०० रुपये ठेवणे सक्तीचे आहे़ इतर प्रकारचे सेवाचार्जेस राहणार नाहीत़ प्रत्येक बँक पैसे भरणा आणि काढण्यासाठी पासबुक देते़ मात्र प्रथमच पोस्ट पासबुकऐवजी स्मार्ट कार्ड स्वरूपात ‘क्यू आर कार्ड’देत आहे

काय असतील सेवासुविधा 

  • बचतीवरील रकमेला ४ टक्के व्याजदर 
  • मोबाईलवर स्टेटस एसएमएस सेवा 
  • मनी ट्रान्स्फार्मरअंतर्गत आरटीजीएस, युपीआय, आयएमपीएस, एईपीएस
  • बिलिंग सेवेंतर्गत मोबाईल बिल, डीटीएच, गॅस, पाणीपट्टी, इन्शुरन्स सेवा
  • बँकेत स्वत:च्या खात्यावर जास्तीत जास्त लाख रुपये जमा करता येतील आणि एकावेळी पाच हजार रुपये पोस्टमनमार्फत मिळतील़ 

दोन दिवसात ५ हजार राखी कव्हरची विक्री 
- दरवर्षी पोस्ट बहीण-भावातील नाते टिकवून ठेवणारी ‘राखी मेल’ योजना यंदाही अमलात आणली आहे़ यंदा वॉटरप्रूफ राखी कव्हर, सेपरेट ट्रेस, स्पेशल बॅग प्रकारात सुविधा दिली आहे़ दोन दिवसात ५ हजार राखी कव्हरची विक्री झाली आहे़ मुख्य पोस्ट कार्यालयात याचे स्वतंत्र कक्ष खोलण्यात आले आहे़ 

पोस्ट पेमेंट बँकेला सोलापूरकरांचा अपेक्षित प्रतिसाद लाभतोय़ बार्शी तालुक्यात गौडगाव येथे एका तासात ३३ जणांनी खाते खोलले आहे़ पेपरलेस अकाउंट आणि पेपरलेस पासबुक असे या योजनेचे वैशिष्ट्य आहे़ पुढील काही दिवसात पंढरपुरात बँकेची उपशाखा सुरू होतेय़ 
- सुरेश शिरसीकर, वरिष्ठ पोस्ट अधीक्षक 

Web Title: Post payment bank in five districts in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.