रामदास कदम, गुलाबराव पाटील अन् शहाजीबापू पाटील यांच्या पोस्टरची सोलापुरात गाढवावरून धिंड

By Appasaheb.patil | Published: September 21, 2022 05:26 PM2022-09-21T17:26:21+5:302022-09-21T17:26:29+5:30

ठाकरे परिवारातील सदस्यांवरील वक्तव्याचा सोलापुरातील शिवसेनेकडून खरपूस समाचार

Posters of Ramdas Kadam, Gulabrao Patil and Shahjibapu Patil were thrown from a donkey in Solapur. | रामदास कदम, गुलाबराव पाटील अन् शहाजीबापू पाटील यांच्या पोस्टरची सोलापुरात गाढवावरून धिंड

रामदास कदम, गुलाबराव पाटील अन् शहाजीबापू पाटील यांच्या पोस्टरची सोलापुरात गाढवावरून धिंड

googlenewsNext

सोलापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मीताई ठाकरे तसेच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेले रामदास कदम, गुलाबराव पाटील आणि शहाजीबापू पाटील यांच्याकडून सातत्याने चुकीची आणि बदनामीकारक वक्तव्य करण्यात येत आहेत. आता तर ठाकरे घराण्याच्या स्नुषा रश्मीताई ठाकरे यांच्यावरच खालच्या भाषेत टीका करायला सुरुवात केली आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या  नेतृत्वाखाली बुधवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी तसेच मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे रामदास कदम, गुलाबराव पाटील आणि शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. या तिघांचे पोस्टर गाढवाच्या गळ्यात घालून धिंड काढण्यात आली. तसेच त्यांच्या पोस्टरला जोडेही मारण्यात आले.

दरम्यान, रामदास कदमचं करायचं काय , खाली मुंडी वर पाय, नीम का पत्ता कडवा है, रामदास कदम भडवा है, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाप्रसंगी महिला आघाडी जिल्हा संघटिका सीमाताई पाटील, उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे, तुकाराम भोजने, दादासाहेब पवार, तालुकाप्रमुख अशोक भोसले, तुकाराम कुदळे, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, य शिवसेनेचे सर्व उपतालुकाप्रमुख ,विभाग प्रमुख ,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक व शिवसेना अंगीकृत संलग्न संघटनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Posters of Ramdas Kadam, Gulabrao Patil and Shahjibapu Patil were thrown from a donkey in Solapur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.