गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:25 AM2021-09-23T04:25:34+5:302021-09-23T04:25:34+5:30
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ संस्थेचे अध्यक्ष शरद्चंद्र पवार यांनी सामाजिक परिवर्तनाच्या ...
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ संस्थेचे अध्यक्ष शरद्चंद्र पवार यांनी सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे सांगोला विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांना जाहीर केला. त्यांनी सांगोला तालुक्याचे आमदार म्हणून ११ वेळा निवडून येऊन विक्रम केला. शेती व सामाजिक कार्यात जीवन वाहून घेत त्यांनी पुलोद सरकारमध्ये पणन व रोजगार हमी मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले. तीन वेळा हंगामी सभापती, शासनाच्या अनेक समित्यांचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करीत असताना केलेल्या कार्याचा विचार करून हा पुरस्कार जाहीर केला आहे.
..................
संस्थाध्यक्ष खा. शरद पवार यांनी अण्णांच्या जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षीपासून प्रथमच हा पुरस्कार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांना जाहीर करुन या पुरस्काराची निश्चितच उंची वाढेल, असा विश्वास दिला. देशमुख परिवारासह तालुक्यातील जनतेला मनापासून आनंद झाला आहे.
-डॉ. बाबासाहेब देशमुख
----फोटो