खंडणीखोर नाकर्त्या सरकारमुळे ओबीसी आरक्षणाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:59+5:302021-06-27T04:15:59+5:30
शनिवारी सकाळी ११ वाजता अक्कलकोट-सोलापूर रोडवर अक्कलकोट शहर व तालुका भाजपच्या वतीने तब्बल दीड तास चक्का जाम आंदोलन केले. ...
शनिवारी सकाळी ११ वाजता अक्कलकोट-सोलापूर रोडवर अक्कलकोट शहर व तालुका भाजपच्या वतीने तब्बल दीड तास चक्का जाम आंदोलन केले. यावेळी ओबीसी आरक्षणासह विविध मागणीचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेवर महास्वामीजी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, पं. स. सदस्य राजकुमार बंदीछोडे, कय्यूम पिरजादे, गुंडप्पा पोमाजी, नगरसेवक महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, महिलाप्रमुख सुरेखा होळीकट्टी, ज्योती जरीपटके, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, आप्पासाहेब पाटील, चंद्रकांत इंगळे, परमेश्वर यादवाड, यशवंत धोंगडे, अप्पू बिराजदार, दयानंद बिडवे, जयशेखर पाटील, प्रदीप पाटील, अण्णाप्पा बाराचारे, ऋषी लोणारी, सिद्धराम हेले, राम व्हनराव, प्रमोद कलशेट्टी, बसवंतराव कलशेट्टी, रमेश कापसे, रजाक सय्यद, शबाब कोरबू, नागराज कुंभार, लखन झंपले, प्रदीप जगताप, चंद्रकांत माळगे, श्रीसैल ठोंबरे, गुरु माळी, वैजीनाथ मुकडे, बाळा शिंदे, प्रवीण शहा, आप्पू कवटगी, शिवशरण वाले, दयानंद बमनळी, जगदेव राठोड, अनिल बर्वे, सिद्धय्या मठपती, पंडित कोरे आदी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड, महेश भावीकट्टी, फौजदार चंद्रकांत पुजारी, धनराज शिंदे, अंगद गिते, विपीन सुरवसे यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
याप्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात आमदार कल्याणशेट्टी, सुरेखा होळळीकट्टी, मोतीराम राठोड, पंडित कोरे आदींनी सरकाच्या विरोधात निषेधाची भाषणे केली.
फोटो ओळ:
सोलापूर रोडवर राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत तासभर चक्का जाम आंदोलन केले. यावेळी खासदार जयसिद्धेवर महास्वामीजी, आ. सचिन कल्याणशेट्टी, सुरेखा होळीकट्टी, मोतीराम राठोड आदी.