सोलापूर महानगरपालिकेत १४५२ कर्मचाºयांची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:47 PM2018-06-22T14:47:52+5:302018-06-22T14:47:52+5:30
महापालिकेने वाढविली ४४९ पदे, सभेकडे प्रस्ताव: १४५२ पदे आहेत रिक्त
सोलापूर : महापालिकेच्या कर्मचाºयांचा आकृतीबंद तयार करण्यात आला असून, रिक्त पदातील चतुर्थश्रेणी कर्मचारी कमी करून ४४९ पदे नव्याने मंजूर करण्याचा प्रस्ताव लवकरच प्रशासनाकडून सभेकडे सादर करण्यात येणार आहे.
महापालिकेला अधिकारी ते कर्मचारी अशी ५४00 पदे मंजूर आहेत. महापालिकेची निर्मिती झाल्यापासून म्हणजे १९५६ नंतर कोणत्याही प्रकारची कर्मचारी भरती झालेली नाही. त्यामुळे मंजूर पदापैकी १४५२ पदे रिक्त झाली आहेत. सध्या जवळजवळ ३९00 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे विविध विभागात कंत्राटी कर्मचाºयांवर भर देऊन काम रेटले जात आहे. असे असले तरी आस्थापना खर्च ३५ टक्क्याच्यावर वर जात असल्याने (५५ टक्के) शासनाने कोणतीही पदे भरण्यास मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांचा आकृतीबंद तयार करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक विभागाकडून आढावा घेतला गेला आहे.
महापालिकेत गेल्या आठ वर्षांत पदोन्नती देण्यात आलेली नव्हती. सेवा ज्येष्ठतेप्रमाणे अधिकारी व कर्मचाºयांची यादी करण्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. बिंदूनामावली, रोस्टर तपासून घेतल्यानंतर रिक्त जागा व पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानंतर डीपीसी किंवा सरळसेवेद्वारे कर्मचारी भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
रिक्त असलेल्या पदातून चतुर्थश्रेणीची पदे कमी करून ४४९ तांत्रिक पदे नव्याने तयार करण्यात आली आहेत. या पदांना मंजुरी द्यावी म्हणून प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला सभेची मान्यता घ्यावी लागणार आहे. प्रशासनाने तयार केलेला आकृतीबंद तातडीने सभेकडे पाठविण्यात यावा अशी मागणी कर्मचारी युनियनचे अशोक जानराव यांनी केली आहे.
पाणीपट्टीवाढीस विरोध
- प्रशासनाने पाणीपुरवठा विभागातील तूट भरून काढण्यासाठी २५ टक्के पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव कदापि मान्य केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया सभागृहनेते संजय कोळी यांनी दिली. अंदाजपत्रकात तुटीपोटी रकमा वर्ग केल्या आहेत. कोणतीही करवाढ, दरवाढ केली नसल्याने प्रशासनाला सभेचा प्रस्ताव डावलता येणार नाही. युजर चार्जेस रद्द करण्याबाबत आमचा पाठपुरावा राहणार आहे.