गरिबी हटाव झोपडपट्टीत धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:21 AM2021-05-17T04:21:17+5:302021-05-17T04:21:17+5:30

सोलापूर : परसिस्टंट फाउंडेशन, अस्तित्व संस्था आणि डोणगाव येथील केंद्रीय निवासी आश्रमशाळेच्या वतीने गरिबी हटाव झोपडपट्टीतील कुटुंबांना अस्तित्व संस्थेचे ...

Poverty Alleviation | गरिबी हटाव झोपडपट्टीत धान्य वाटप

गरिबी हटाव झोपडपट्टीत धान्य वाटप

Next

सोलापूर : परसिस्टंट फाउंडेशन, अस्तित्व संस्था आणि डोणगाव येथील केंद्रीय निवासी आश्रमशाळेच्या वतीने गरिबी हटाव झोपडपट्टीतील कुटुंबांना अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे, आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत फडतरे, स्वाती जगझाप यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे ऊसतोड मजूर, बिडी कामगार, घरकाम करणारे मजूर, भटके विमुक्त अशा असंघटित क्षेत्रातील घटकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. अशा घटकांतील गरजू कुटुंबांना अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून हातभार लावण्याचा प्रयत्न आहे. दोन दिवसांपूर्वी विजापूर नाका परिसरात गरिबी हटाव झोपडपट्टीतील काही कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. ज्वारी, गहू, तांदूळ, तेल, तूर डाळ, साबण, वाॅशिंग पावडर, शेंगादाणे, साखर, हळद, मीठ अशा जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी सुजाता फडतरे, खंडेराव लांडगे, केवल फडतरे, सुषमा फडतरे, क्रांती आठवले, मीनाक्षी गायकवाड, शर्मिला कांबळे, गणेश भागवत, जहांगीर तांबोळी, नितीन कांबळे, सुधीर कुरडे उपस्थित होते.

---

फोटो : १६ भाटेवाडी

गरजू कुटुंबांना धान्य वाटपप्रसंगी शहाजी गडहिरे, यशवंत फडतरे, स्वाती जगझाप.

Web Title: Poverty Alleviation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.