सत्ताधाºयांनी संविधान बदलण्याचा घाट घातलाय, जोगेंद्र कवाडे यांची भाजपावर टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:10 PM2018-06-11T12:10:28+5:302018-06-11T12:10:28+5:30
जोगेंद्र कवाडे हे सोलापूरच्या दौºयावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सोलापूर : सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने भारतीय संविधान बदलण्याचा घाट घातला आहे. पुंजीपतीचे कर्ज माफ केले जात आहे, मात्र शेतकºयाला वाºयावर सोडले जात आहे. खºया अर्थाने हे भांडवलदारांचं राज्य असून, ते आता बदलण्याची गरज आहे, असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले.
जोगेंद्र कवाडे हे सोलापूरच्या दौºयावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कवाडे पुढे म्हणाले की, २0१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी घोषणा केली. अनेक आश्वासने देऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आला, मात्र हे सरकार देशातील जनतेची सपशेल फसवणूक करीत आहे.
‘अच्छे दिन’च्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला अफुची गोळी देऊन गुंगीत ठेवण्याचे काम करीत आहेत़ देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टी भारतीय संविधान बदलून देशात मनुस्मृती लागू करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. हा खूप मोठा धोका असून, नागरिकांनी आता सावध होण्याची गरज आहे. येत्या लोकसभा, विधानसभेत भाजपाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे कवाडे म्हणाले.
रिपाइंच्या ऐक्याबाबत बोलताना कवाडे म्हणाले की, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे रामदास आठवले यांनी प्रथम ऐक्य करावे नंतर आम्ही या ऐक्याच्या सागरात सामील होऊ, अशी भूमिका स्पष्ट केली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे, शहराध्यक्ष अमित कांबळे, रमेश सरवदे, लौकिक इंगळे, कपिल बनसोडे आदी उपस्थित होते.
पक्षातून पाच जणांची हकालपट्टी...
- पक्षाच्या नावावर बेकायदेशीर कृत्य करणाºया कार्यकर्त्यांना पक्षामध्ये कोणतेही स्थान नाही. बिभीषण लोंढे, अमोल गोडसे, राहुल शंके, शांतीकुमार नागटिळक आदींसह पाच जणांना पक्षातून काढून टाकत असल्याची घोषणा यावेळी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केली. यापूर्वीच या लोकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, तशी घोषणा जयदीप कवाडे यांनी सोलापुरात येऊन केली होती.
जयदीप कवाडे यांना खोटे ठरवत पुन्हा पक्षात असल्याचे सांगितले. मी सोलापुरात येऊन याची अधिकृत घोषणा करणार होतो म्हणून यावर प्रतिक्रिया दिली नाही. या कार्यकर्त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, पक्षाच्या नावाने जर काही करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही कवाडे यांनी सांगितले.