वीजतोडणी मोहीम बंद करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:36+5:302021-03-21T04:21:36+5:30
सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. वेळेवर उसाचे बिल मिळत नाही. कोरोना, अतिवृष्टी, महापूर यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशा ...
सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. वेळेवर उसाचे बिल मिळत नाही. कोरोना, अतिवृष्टी, महापूर यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सरसकट वीजतोडणी केले जात आहे. विधानसभा अधिवेशनात सुरुवातीला वीज तोडणे बंद करा म्हणायचे आणि शेवटच्या दिवशी पुन्हा वीजतोडणीचे आदेश द्यायचे, या दुतोंडी सरकारच्या मनमानीमुळे शेतकरी देशधोडीला लागत आहे. वीज तोडणे बंद करावे, अन्यथा रासपकडून मोर्चा, आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, सुरेश गुत्तेदार, दत्ता माडकर, शिवानंद गाडेकर, दाजी कोळेकर, गुणवंत लवटे, स्वामीनाथ घोडके आदी उपस्थित होते.
फोटो
२०अक्कलकोट-रासप निवेदन
ओळ:- अक्कलकोट येथे महावितरणचे अधिकारी म्हेत्रे यांना निवेदन देताना रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, दत्ता माडकर, सुरेश गुत्तेदार आदी.