थकबाकी वसुलीसाठी ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्पावरील वीजपुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:20 AM2021-03-22T04:20:49+5:302021-03-22T04:20:49+5:30

पानगांव : ढाळे पिंपळगांव मध्यम प्रकल्पावरील वीजपुरवठा रविवारी सकाळपासून बंद करण्यात आला. वीज बील वसुलीसाठी वीज वितरणने ही कारवाई ...

Power supply to Dhale Pimpalgaon medium project interrupted for recovery of arrears | थकबाकी वसुलीसाठी ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्पावरील वीजपुरवठा खंडीत

थकबाकी वसुलीसाठी ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्पावरील वीजपुरवठा खंडीत

Next

पानगांव : ढाळे पिंपळगांव मध्यम प्रकल्पावरील वीजपुरवठा रविवारी सकाळपासून बंद करण्यात आला. वीज बील वसुलीसाठी वीज वितरणने ही कारवाई केली. त्यामुळे प्रकल्पावरील सात गावामधील सुमारे ७०० उचल पाणी परवाना धारक शेतक-यांमधून संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे बाजारपेठा बंद आणि चालू होत आहेत. बाजारभावाची हमी नाही. निसर्गाची अवकृपा या समस्यांना तोंड देत शेतकरी दिवस ढकलत आहेत. बॅंका, फायनान्स, पतसंस्था यांचा तगादा सुरूच आहे. त्यातच ऐन सुगीत वीज वितरणने वीजपुरवठा बंद केल्याने शेतक-यांच्या ऊस, भुईमूग, द्राक्ष, या पिकांचे नुकसान होत आहे.

वीजपुरवठा बंद केलेला कळल्यानंतर लगेच प्रकल्पावर शेतक-यांची गर्दी वाढू लागली. या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्याची बैठक पार पडली.

दरम्यान वीज वितरण कंपनीच्या जबाबदार अधिका-यांचे मोबाईल बंद असल्याचे स्पष्ट झाले.

--

२१ पानगाव

ढाळे पिंपळगांव मध्यम प्रकल्पापाचा वीजपुरवठा खंडीत केल्यानंतर जमा झालेले शेतकरी

Web Title: Power supply to Dhale Pimpalgaon medium project interrupted for recovery of arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.