तुटलेले पोल दुरूस्त झाल्याने वीजपुरवठा झाला पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:03+5:302021-04-29T04:17:03+5:30
सुस्ते परिसरातील मेन लाईनचे १५ पोल तुटले होते. तुगंत गावढाण फिडरच्या ३५ गळ्यातील तुटलेल्या तारांच्या जोडण्या, रोहित्राचे दोन ...
सुस्ते परिसरातील मेन लाईनचे १५ पोल तुटले होते. तुगंत गावढाण फिडरच्या ३५ गळ्यातील तुटलेल्या तारांच्या जोडण्या, रोहित्राचे दोन नवीन पोल उभे केले. त्याच रोहित्राला विद्युतपुरवठा करणाऱ्या सात गाळ्यातील तुटलेल्या तारांची जोडणी करण्यात आली आहे. सरडेवाडी गावठाण रोहित्राचा तुटलेला पोल नवीन उभा करून त्याच रोहित्रावरील एलटीचा तुटलेला एक पोल नव्याने उभा करून तुटलेल्या तारा जोडल्या.
बीटरगाव, चोरमळा वस्ती गावठाण, बोरकर रोहीत्र, माणिक चव्हाण गावठाण, वठारवाट फिडर हळणवर वस्ती, चव्हाण वस्ती गावठाण परिसरातील रोहित्र व तुटलेल्या तारांची जोडणी करण्यात आली आहे. हे काम अनिल इलेक्ट्रिक (शेवते) यांच्या मार्फत पूर्ण केले आहे. गारपिटीसह वाऱ्याने मोठमोठी झाडे उन्मळून विद्युतपुरवठा करणाऱ्या तारेवर पडल्यामुळे जागोजागी पोल तुटले होते. यामुळे विद्युत जोडणीचे कामाला वेळ लागला.
कोट :::::::::::::::::::::
गारपिटीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर एक ते दोन दिवसांनंतर शेतकऱ्यांचे व नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून शेतीपंपाच्या विद्युत पुरवठ्यातून तात्पुरता विद्युत पुरवठा सुरू करून दिला होता. जागोजागी तारा तुटल्याने काम करण्यास येणाऱ्या अडचणीमुळे १३ दिवसांनंतर वीज जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. भगीरथचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत केला आहे.
- एन. पी. वाघमारे
उपशाखा अभियंता, तुगंत
फोटो ::::::::::::::::::::::
गारपिटीमुळे विद्युत वाहक तारेवर झाडे पडल्याने जागोजागी तुटलेल्या पोलची दुरुस्ती करताना वीज वितरणचे कामगार व ठेकेदार.