आकडा टाकृन ६० हजाराची वीज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:27 AM2021-02-17T04:27:49+5:302021-02-17T04:27:49+5:30
याबाबत अधिक महिती अशी यातील भारत गायकवाड यांच्या रिधोरे येथे जल शुद्धीकरण केंद्र असून त्यांनी महावितरणच्या एल. टी. ...
याबाबत अधिक महिती अशी यातील भारत गायकवाड यांच्या रिधोरे येथे जल शुद्धीकरण केंद्र असून त्यांनी महावितरणच्या एल. टी. लाईनवर दोन कोअर सर्विसच्या वायरचे हूक करून आकडा टाकून अनधिकृत विजेचा वापर केला. कुर्डुवाडी महावितरण पथकास तपासणी करताना हा प्रकार दिसून आला. यामुळे त्यांनी ६ महिन्याच्या काळात २३२२ युनिट वीज चोरी करून ३५,३९९ रुपयांचे नुकसान केल्याने वीज चोरीचे बील दिले होते.
तर यातील दुसरे शशिकांत माळी यांचा कव्हे (ता.माढा) येथे पेट्रोल पपं आहे. यातील फिर्यादी व त्याच्या पथकांने जाऊन वीज मीटरची चौकशी करत असताना एल.टी.लाईनवर दोन वायरच्या हूकद्वारे अनधिकृत वापर करत असल्याचे दिसले. गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी १६५२ युनिट विजेची चोरी करून महावीतरणचे २५,७१४ रुपयांचे नुकसान केल्याने त्यांना वीज चोरीचे बिलही देण्यात आले. यात त्यानी १५ हजाराची तडजोडीची व बिलाची रक्कमही भरली नसल्याने दोघवर हा गुन्हा दाखल केला आहे.