महूदमध्ये सव्वा लाखाची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:01+5:302021-03-18T04:22:01+5:30

महावितरणचे सहायक अभियंता बाळकृष्ण काशिनाथ खरात, तंत्रज्ञ सचिन सरवदे, योगेश रामचंद्र गाडेकर, सोमनाथ मारुती कांबळे असे तिघे मिळून १७ ...

Power theft of Rs | महूदमध्ये सव्वा लाखाची वीज चोरी

महूदमध्ये सव्वा लाखाची वीज चोरी

Next

महावितरणचे सहायक अभियंता बाळकृष्ण काशिनाथ खरात, तंत्रज्ञ सचिन सरवदे, योगेश रामचंद्र गाडेकर, सोमनाथ मारुती कांबळे असे तिघे मिळून १७ मार्च रोजी महूद (ता.सांगोला) येथील अकलूज रोडवरील कोळेकरवस्ती येथील महावितरणच्या गोविंद डेअरी गावठाण रोहित्रावरील ग्राहकांच्या कनेक्शनच्या तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी सुरेश शिंदे यांनी थ्री फेज कनेक्शनच्या मीटरचे इनपूट थ्री फेज टर्मिनल व न्यूट्रल टर्मिनलमध्ये अनधिकृतपणे काळ्या रंगाची वायर जोडली. तसेच वीज मीटर आउटपूट टर्मिनलला कोणताही लोड जोडला नसल्याचे आढळले.

संबंधित ग्राहकाची वीज युनिट वापराची नोंद महावितरण वीज मीटरवर होत नसल्याचे दिसून आले.

सुरेश शिंदे यांच्या दुकानांमध्ये ७.८९ के. व्ही. के .डब्लू लोड आढळून आला. त्यांनी १ लाख २३ हजार ७५० रुपयांच्या ५ हजार ९३१ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. शिंदे यांनी गेल्या एक वर्षांपासून वीज चोरी केली असून तडजोडीची रक्कम ४० हजार रुपये आहे.

Web Title: Power theft of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.