प्रकाश आंबेडकरांसाठी सोलापूर जिल्ह्यातील भीमसैनिकांनी घेतला एकीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:46 PM2019-03-30T12:46:06+5:302019-03-30T12:48:21+5:30

प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला विरोध नको म्हणून बसपातर्फे उमेदवारी दाखल केलेले राहुल सरवदे यांनी शुक्रवारी माघार घेतली.

Prakash Ambedkar decided to take the decision of Ek Tha Tiger in Solapur district | प्रकाश आंबेडकरांसाठी सोलापूर जिल्ह्यातील भीमसैनिकांनी घेतला एकीचा निर्णय

प्रकाश आंबेडकरांसाठी सोलापूर जिल्ह्यातील भीमसैनिकांनी घेतला एकीचा निर्णय

Next
ठळक मुद्देभीमसैनिकांची बुधवारपेठेतील अस्थिविहाराजवळ झाली बैठक बसपातर्फे उमेदवारी दाखल केलेले राहुल सरवदे यांनी शुक्रवारी माघार घेतली.  प्रथमच वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून उमेदवारी दाखल केली

सोलापूर : भीमसैनिकांची बुधवारपेठेतील अस्थिविहाराजवळ बैठक झाली. सर्व गट-तट विसरून निळ्या निशाण्याखाली एक होण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी सुभाष बनसोडे, रवी गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, दशरथ कसबे, आनंद चंदनशिवे, कुणाल बाबरे, अजित गायकवाड, अजित गाडेकर आदी उपस्थित होते. 

दरम्यान  प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला विरोध नको म्हणून बसपातर्फे उमेदवारी दाखल केलेले राहुल सरवदे यांनी शुक्रवारी माघार घेतली.  

बसपातर्फे राहुल सरवदे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळेस प्रथमच वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून उमेदवारी दाखल केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवित असल्याने त्यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करू नये, अशी भूमिका बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी घेतली होती. बसपाने त्यांच्या विरोधात उमेदवारी दिल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ, असे पत्र चंदनशिवे यांनी पक्षप्रमुखांकडे दिले होते. त्यावर सरवदे यांनी चंदनशिवे हे वॉर्डापुरते असून, येथे पक्षाचा प्रश्न आहे, असे म्हटले होते. 

शुक्रवारी उमेदवारी माघार घेण्याचा दिवस होता. दुपारी सरवदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी माघार घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत मागासवर्गीय समाज हा काँग्रेस व भाजपा यांच्या पाठीमागे जात होता.
पण यावेळेस प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे पहिल्यांदाच सर्वजण संघटित झाले आहेत़ त्यामुळे आम्ही कशाला विरोध करायचा म्हणून बसपाकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेत आहे. बसपाने उमेदवारी मागे घेतल्याने आता माझा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असे नगरसेवक चंदनशिवे यांनी म्हटले आहे. या बैठकीस विविध गटांचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Prakash Ambedkar decided to take the decision of Ek Tha Tiger in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.