प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला; ठिकाण कोणते पहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 02:45 PM2019-03-25T14:45:46+5:302019-03-25T14:50:50+5:30

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पदयात्रेला सकाळी दहा वाजता ...

Prakash Ambedkar filed nomination papers for Lok Sabha elections; See what the place! | प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला; ठिकाण कोणते पहा !

प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला; ठिकाण कोणते पहा !

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणुक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले याच्याकडे सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलापदयात्रेत मोठ्या प्रमाणात हजारो कार्यकर्त्यानी सहभाग नोंदविला होता.

सोलापूर : सोलापूरलोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पदयात्रेला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. 

न्यू बुधवार पेठ येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली.  यावेळी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर, शंकरराव लिंगे, शमी उल्ला शेख, श्रीशैल गायकवाड, प्राध्यापक डॉ. धम्मपाल माशाळकर आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळी साडे नऊ वाजल्यापासून न्यु बुधवार पेठ येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती. अकरा पंचेचाळीस वाजता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आगमन झाले. उद्यानांमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत मोठ्या प्रमाणात हजारो कार्यकर्त्यानी सहभाग नोंदविला होता.

निळा, हिरवा, पिवळा आधी रंगाचे झेंडे कार्यकर्ते हातामध्ये घेऊन घोषणाबाजी करीत होते. दुपारी एकच्या सुमारास डॉ़ प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले याच्याकडे सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी एमआयएमचे तौफिक शेख, श्रीशैल गायकवाड, शमीउल्लाह शेख, शंकरराव लिंगे, प्रा़ धम्मपाल माशाळकर आदी उपस्थित होते़ 

Web Title: Prakash Ambedkar filed nomination papers for Lok Sabha elections; See what the place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.