प़महाराष्ट्रातील योजना प्रलंबित : ठाकरे
By admin | Published: June 22, 2014 12:49 AM2014-06-22T00:49:29+5:302014-06-22T00:49:29+5:30
योजना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्या आहेत़
सांगोला : पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागास वरदान ठरणाऱ्या शेतीच्या सिंचन योजना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्या आहेत़ या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून देण्याचे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
राज्यात भाजप-सेनेचे सरकार असताना अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत़ पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यासाठी शेतीचे पाणी मिळावे यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करून मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली़ प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने या सर्व सिंचन योजनाच सडवून टाकल्या आहेत. या योजना जाणीवपूर्वक अर्धवट ठेवल्या.
सिंचन योजनेत सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. गेल्या १४ वर्षांत आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही सिंचनाची कामे अपूर्ण ठेवली आहेत. लवकरच आपण सांगोला दौरा करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
अॅड. शहाजीबापूंना शिवसेना बळ देईल, परंतु कसल्याही परिस्थितीत सांगोला विधानसभा मतदारसंघात भगवा फडकला पाहिजे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर, सांगोला विधानसभा निरीक्षक निवांत घेरडे, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, पुरुषोत्तम बरडे, शाहू शिंदे, माजी आमदार राजेंद्र राऊत, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, नगरसेविका अस्मिता गायकवाड, संभाजी शिंदे, सूर्यकांत घाडगे, मधुकर बनसोडे, कमरुद्दीन खतीब, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, अॅड. उदयबापू घोंगडे, नगरसेवक अरुण बिले, आनंद घोंगडे, बाळासाहेब मस्के, बाबुराव खंदारे, सुनील भोरे, राजकुमार जाधव, संदीप केंदळे, सुभाष पाटील, सागर पाटील, नंदकुमार शिंदे, पांडुरंग मिसाळ, अजितकुमार ताटे, विजय शिंदे, रवींद्र पाटील, दिग्विजय पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.