राहुल गांधींना हस्तांदोलन करीत प्रणिती शिंदे यांनी घेतली शपथ
By राकेश कदम | Updated: June 25, 2024 13:08 IST2024-06-25T13:08:32+5:302024-06-25T13:08:47+5:30
हातात संविधानाची प्रत घेऊन शिंदे यांनी शपथ घेतली.

राहुल गांधींना हस्तांदोलन करीत प्रणिती शिंदे यांनी घेतली शपथ
राकेश कदम, साेलापूर : माढ्याचे खासदार धैर्यशील माेहिते-पाटील आणि साेलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी लाेकसभेच्या अधिवेशनात सदस्यपदाची शपथ घेतली. खासदार प्रणिती शिंदे यांनी शपथ घेण्यापूर्वी काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना हस्तांदाेलनही केले. हातात संविधानाची प्रत घेउन शिंदे यांनी शपथ घेतली.
लाेकसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यपदाची शपथ दिली जात आहे. साेलापूर लाेकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभूत करून खासदार प्रणिती शिंदे यांनी विजय मिळविला. माढा लाेकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पराभूत करून धैर्यशील माेहिते-पाटील विजयी झाले. माेहिते-पाटील यांनी शपथ घेताना जॅकेट परिधान केले हाेते. जिल्ह्यातील दाेन्ही खासदारांनी हिंदीतून शपथ घेतली. प्रणिती शिंदे यांच्या शपथविधीवेळी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह शिंदे कुटुंबीय हजर हाेते.