वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रशांत गाेणेवार
By राकेश कदम | Published: May 4, 2023 12:23 PM2023-05-04T12:23:48+5:302023-05-04T12:24:27+5:30
वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षांनी एक वर्षापूर्वी राजीनामा दिला हाेता
राकेश कदम
साेलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षपदी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील माेची समाजाचे नेते प्रशांत गाेणेवार यांची निवड करण्यात आली आहे. महासचिवपदी विनाेद इंगळे, अकील शाक्य यांची निवड करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षांनी एक वर्षापूर्वी राजीनामा दिला हाेता. एक वर्षापासून हे पद रिक्त हाेते. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शहर कार्यकारिणीची नुकतीच घाेषणा केली. ही निवड करताना वंचित बहुजन आघाडीने सामाजिक समीकरण साधल्याची चर्चा आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील माेची समाजाने काॅंग्रेसला माेठी साथ दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने नवा शहराध्यक्ष माेची समाजात निवडला आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवूनच ही निवड झाल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे - उपाध्यक्ष -राम रणसुरे, झाकीर शेख, राेहित लालसरे, इंद्रजीत कांबळे, श्रीनिवास संगेपांग, विजयानंद उघडे, संताेष बनसाेडे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकारिणीचा लवकरच विस्तार हाेणार आहे. यामध्ये प्रत्येक वाॅर्डातील कार्यकर्त्यांचा समावेश हाेणार आहे. कार्यकर्त्यांची नावे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात सादर करण्यात यावीत, असे ठाकूर यांनी कळविले आहे.