चित्रकला आणि मुर्तीकलेत जीव ओतणारा सोलापूरचा चित्रकार प्रशांत यमपुरे

By Admin | Published: March 30, 2017 02:16 PM2017-03-30T14:16:13+5:302017-03-30T14:16:13+5:30

आॅनलाईन लोकमत सोलापूर दि़ ३०

Prashant Yampure, a painter of painting and painting in Solapur | चित्रकला आणि मुर्तीकलेत जीव ओतणारा सोलापूरचा चित्रकार प्रशांत यमपुरे

चित्रकला आणि मुर्तीकलेत जीव ओतणारा सोलापूरचा चित्रकार प्रशांत यमपुरे

googlenewsNext

चित्रकला आणि मुर्तीकलेत जीव ओतणारा सोलापूरचा चित्रकार प्रशांत यमपुरे

आप्पासाहेब पाटील - सोलापूर
एखाद्याला समोर बसवून काही वेळात त्याचे हुबेहूब चित्र रेखाटणे अन् रेखाटलेले चित्र मूर्तीकलेत साकारणे... म्हणजे चित्रकला अन् मूर्तीकलेचा संगमच म्हणावा लागेल़ कलाकाराला एखादीच कला अवगत असते. प्रशांतने मात्र चित्रकला आणि मूर्तीकला या दोन्ही कला आत्मसात केल्या आहेत़ भारतीय संस्कृतीचे जतनही या अवलिया कलाकाराने आपल्या कुंचल्याने केले आहे़ हा आहे सोलापूरचा उदयोन्मुख कलाकार प्रशांत यमपुरे़
सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील आनंद नगर येथे राहणारा प्रशांत यमपुरे हा उच्चशिक्षित आहे़ प्रशांतचे प्राथमिक शिक्षण जैन गुरुकुल प्रशाला, बाळीवेस येथे झाले़ त्यानंतर ११ व १२ वीचे शिक्षण कुचन प्रशालेत तर उच्च शिक्षणासाठी तो पुणे स्थायिक झाला़ उच्च शिक्षण घेतल्यामुळे व आरक्षणामुळे प्रशांतला अनेक शासकीय नोकऱ्यांची आॅफर मोठ्या प्रमाणात आल्या होत्या; मात्र चित्रकलेचा छंद आत्मसात केल्याने चित्रकलेतच करिअर करण्याची जिद्द बाळगली़ सुरुवातीला काही वर्षे काहीच पदरात पडत नव्हते़ त्यामुळे या छंदामुळे भविष्य अंधारमय होतेय का असे वाटत असताना जिद्द बाळग़़क़ाहीतरी चांगलं होईल असा धीर देणाऱ्या मित्रांमुळे प्रशांतने चित्रकलेचा ध्यास सोडला नाही़ सुरुवातीला मोडक्या तोडक्या रुपात चित्रे साकारणारा प्रशांत आज मोठ्या चित्रकारांना लाजवेल अशी चित्रे काढतोय़
---------------------
आयकॉन आॅफ इंडियातूनही रेखाटली चित्रे
च्कोणता चित्रकार कोणत्या प्रकारची चित्रे काढेल याचा काही नियम नसतो; मात्र चित्रकलेत नवनवीन प्रकार शोधण्यासाठी प्रत्येक चित्रकाराची धडपड असते़ असाच धडपड करणारा चित्रकार प्रशांत यमपुरे यांनी आयकॉन आॅफ इंडियाच्या संकल्पनेतून देशातील दिग्गज लोकांची चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न करीत आहे़ यात आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती रतनटाटा यांची चित्रे रेखाटलेली आहेत़ पोट्रेट प्रकारातील थ्री डी पोट्रेटमध्ये वाळूचे विविध प्रकार वापरून चित्रे बनविणे प्रशांतची एक वेगळी कला आहे़
---------------------
प्रदर्शनासाठी परदेशातून बोलावणं़़़
च्सोलापूरचा चित्रकार प्रशांत यमपुरे हा भारतीय संस्कृतीचे जतन करण्यात अग्रेसर आहे़ भारतातील बहुसंख्य नागरिक परदेशी स्थायिक झाले आहेत़ त्यामुळे भारतीय चित्रकारांच्या कलेस प्रोत्साहन व त्यांचे कौतुक करण्यासाठी परदेशातील अनेक मंडळी आता प्रशांत यमपुरे यास निमंत्रण देत आहेत़ याच धर्तीवर पुढील महिन्यात हाँगकाँग, सिंगापूर, लंडन आदी ठिकाणी प्रदर्शन होणार आहे़ प्रशांतने यापूर्वी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, कोलकात्ता याठिकाणी प्रदर्शन करून सोलापूरची चमकदार कामगिरी दाखवून दिली आहे़
--------------------
परदेशातील भारतीयांचा तो चाहता़़़़
च्भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भरतनाट्यम, मणिपुरी, कथ्थकली, आदिवासी, बंगाली, महाराष्ट्रीयन वधू यांच्यावरील चित्रे रेखाटणे ही वेगळी कला प्रशांतने आत्मसात केली आहे़ भारतीय संस्कृतीचे जतन, जनजागृती, प्रचार, प्रसार करणारा चित्रकार म्हणूनही त्यांची ओळख संपूर्ण देशभर आता होऊ लागली आहे़ त्यामुळेच मुळात भारतीय असलेले मात्र नोकरीच्या निमित्ताने परदेशी स्थायिक झालेल्या नागरिकांचा तो आता चाहता बनला आहे़
----------------
राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
च्जिद्द, मेहनत, परिश्रमाने रात्रंदिवस अभ्यास, सराव करीत विविध चित्रकारांची प्रदर्शने पाहून जेडीआर क्षेत्रात टॉप होण्याचे स्वप्न पाहिले होते़ सोलापूरचा चित्रकार प्रशांत यमपुरे याने अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे चित्रकलेतील पदवी (जेडीआर) मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला़ त्यामुळे संपूर्ण राज्यभरात सोलापूरचे नाव चमकले़
-----------------
भारतीय संस्कृती खूप सुंदर आहे़ या संस्कृतीचे जतन, प्रचार, प्रसार करण्यासाठी यापुढील काळात काम करणार आहे़ चित्रकलेत वेगळे काही करण्यापेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीत खूप काही वेगळे आहे तेच करण्याचा प्रयत्न करणार आहे़
- प्रशांत यमपुरे, चित्रकार, सोलापूऱ

Web Title: Prashant Yampure, a painter of painting and painting in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.