पावसासाठी मुस्लीम बांधवांचे नमाज पठण; दीड महिन्यापासून पावसाची दडी
By दिपक दुपारगुडे | Published: September 19, 2023 06:21 PM2023-09-19T18:21:10+5:302023-09-19T18:21:23+5:30
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील मुस्लीम समाज बांधवांनी पाऊस पडावा यासाठी नरखेड येथील इदगाहवर नमाज पठण केले.
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील मुस्लीम समाज बांधवांनी पाऊस पडावा यासाठी नरखेड येथील इदगाहवर नमाज पठण केले. यावेळी समाजबांधवानी पाऊस पडावा, यासाठी प्रार्थना केली. मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेतातील सोयाबीन, तूर, मटकी, चवळी, मका, आदी पिके सुकू लागली आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे विहीर, बोअरला पाणी कमी झाले आहे. त्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. पाऊस न झाल्यास हातची आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत पाण्याची गरज असून पाऊस पडावा म्हणून मुस्लीम समाज बांधवांनी नरखेड येथे नमाज पठण केले.
यावेळी मौलाना मुजमिल, युसूफ इनामदार, रफीक तांबोळी, अल्लाउद्दीन इनामदार, उस्मान शेख, आयुब बागवान, शौकत शेख, अशफाक बागवान, मोसिन कोतवाल, शेसाब कोतवाल, सरपंच बाळासाहेब मोटे, ग्रामपंचायत सदस्य अकबर इनामदार, बाबुलाल इनामदार, बाळासाहेब गरड याच्यासह मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.